कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयाची विविध ठिकाणांना भेटी.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयाची विविध ठिकाणांना भेटी.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमामध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता विविध ठिकाणच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हॉस्पिटल भेट,जलशुद्धीकरण प्रकल्प भेट तसेच आयुर्वेदिक फार्मसी भेट, ड्रग डिस्ट्रीब्यूटर व फार्मसी भेट या आयोजित करण्यात आल्या होत्या. फार्मसी मधील सोशल फार्मसी फार्मसी, फार्माकोगन्सोसी आणि कम्युनिटी फार्मसीच्या अभ्यासक्रमांतर्गत या भेटी देण्यात आल्या होत्या.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्स इनचार्ज प्रा. पूजा भोसले, प्रा. प्रियांका आलेकरी, प्रा. प्रियांका माळी व प्रा. श्रद्धा वैद्य यांनी या भेटींचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालय उंडाळे, जय भवानी मेडिकल उंडाळे, सुमन आयुर्वेदि आयुर्वेदिक्स, सुमन मेडिकल, राहुल डिस्ट्रीब्यूटर्स आणि जलशुद्धीकरण केंद्र मलकापूर या ठिकाणी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकरता भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

Comments
Post a Comment