रिळे ता. शिराळा येथे बौद्ध धम्म परिषदेच आयोजन.
रिळे ता. शिराळा येथे बौद्ध धम्म परिषदेच आयोजन.
शिराळा -प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)
रिळे ता.शिराळा येथे 19फेब्रुवारी 2024 रोजी 3री बौद्ध धंम्म परिषद समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
या धम्म परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या नियोजनाची बैठक चिंचोली येथे संपन्न झाली. यावेळी दिलीप कांबळे, सुनिल झिमूर, वैभव वाघमारे,भारत मोहीते,अजय एटम,शंकर ढेकळे, कृष्णा कांबळे, रणधीर कांबळे, विपूल कांबळे, संभाजी घोलप, सुनिल वाघमारे,विजय कांबळे, संजय आढाव, विनोद आढाव,उपस्थित होते. याबरोबरच अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी व सी. आर. सांगलीकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Post a Comment