कृषीदूतांचे साळशिरंबे गावात आगमन.
कृषीदूतांचे साळशिरंबे गावात आगमन.
उंडाळे: प्रतिनिधी
साळशिरंबे ता.कराड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय , कराड येथील कृषीदूतांचे आगमन झाले.साळशिरंबे गावच्या सरपंच सौ. प्रमिलाताई कुंभार , उपसरपंच श्री. अभिजीत चवरे , ग्रामसेवक श्री. शरद चव्हाण, पोलीस पाटील सौ. उमा पाटील , तलाठी श्री. अमोल लावंड , कृषी सहाय्यक श्री. तोरणे साहेब व ग्रामस्थांनी कृषिदूतांचे स्वागत केले.
महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुत सागर बंडगर, आदित्य बोरकर, प्रदिप ढेरे, दिग्विजय शिंदे, प्रथमेश जाधव, वैभव शेळके, वैभव शिंदे हे सर्व गावामध्ये राहून विविध शेती विषयक प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी कृषीदूतांनी उपस्थित ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश व रूपरेषा समजावून सांगितली. तसेच गावातील पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
या उपक्रमासाठी शासकीय कृषी महाविद्यालय , कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. एस. व्ही. बुलबुले , कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. आर. हसुरे , केंद्र प्रमुख डॉ. आर. डी. निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. हंकारे आणि विषयतज्ज्ञ डॉ. ज्योती वाळके यांनी मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment