तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल. __डॉ.संदिप डाकवे.
तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल. __डॉ.संदिप डाकवे.
कराड:- प्रतिनिधी.
सैदापूर विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयास इंडिया ऑफ रेकॉर्ड होल्डर युवा चित्रकार, पत्रकार, लेखक, डॉ. संदीप डाकवे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देऊन आपला अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. त्याप्रसंगी ते म्हणाले,"समाजातील विविध घटकांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालये प्रयत्न करत आहेत.वाचन संस्कृतीच्या माध्यमातून ज्ञानात्मक समाज घडविण्याची जबाबदारी जशी ग्रंथालयांची आहे तशी समाजातील ज्ञानसंपन्न, विचारवंतांचीही आहे. वाचनाने समृद्ध होणारा माणूस समाजाचे प्रामाणिक नेतृत्व करुन त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहतो.समाजातील प्रत्येक घटकांनी आपला वाढदिवस ग्रंथालयाला ग्रंथ देऊन केल्यास येणाऱ्या काळात तरुण पिढी याचा आदर्श घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च होणारा पैसा योग्य मार्गी लागेल. वाचनसंस्कृती ही फक्त ग्रंथालयांची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची आहे. तरुणांना योग्य प्रबोधन झाल्यास निश्चितपणे तरुण पिढी वाचनाकडे वळेल."
यावेळी रेश्मा डाकवे, सीमा कांबळे, शंकर काशीद तसेच ग्रंथालयाचे सभासद वाचक उपस्थित होते आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.

Comments
Post a Comment