केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेत पाचगणी शाळेचे घवघवीत यथ.

 केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेत पाचगणी शाळेचे घवघवीत यश.


शिराळा -प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)

न्यू इग्लिश स्कूल येळापूर, केंद्र मेणी ता- शिराळा येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा पाचगणी या शाळेने घवघवीत यश संपादन केले.केंद्रस्तरीय स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या  लहान गटात शाळेचा विद्यार्थी विघ्नेश रघुनाथ पाटील याने 50 मी धावने द्वितीय क्रमांक ,100मीधावने प्रथम क्रमांक ,लांब उडी प्रथम क्रमांक पटकावत शाळेसाठी सर्वाधिक पदके मिळवली.

 तसेच 1ते 4 गटात रिले 50 मीटर या स्पर्धेत विघ्नेश पाटील, कौस्तुभ कांबळे, आयुष मोरे,व सुजल पाटील या चौघांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

5 ते 8 वी या मोठ्या गटात वैयक्तिक स्पर्धेत 100 मी.धावणे मध्ये अवधुत रघुनाथ पाटील याने द्वितीय, 400 मी धावणे मध्ये जीवन आधिक पाटील याने द्वितीय, गोळा फेक या स्पर्धेत मंगेश विलास एटम याने तृतीय क्रमांक पटकावला. यासोबतच 

मोठ्या गटात  रिले 100 मी  धावणे मध्ये जीवन पाटील, रविराज चव्हाण, अवधुत पाटील व करण चव्हाण या चौघांनी शाळेसाठी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख घोडे पाटील ,मुख्याध्यापिका जाधव मॅडम,व मुल्लणी मॅडम, व कपटकर सर यांनी मार्गदर्शन केले क्रिडा स्पर्धेतील या यशाबद्दल सरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थीचे आणि शिक्षकाचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .