ग्रंथ दान हे कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन आहे. - अशोकराव थोरात.

 

ग्रंथ दान हे कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन आहे.
       - अशोकराव थोरात.

कराड :- प्रतिनिधी.

नांदलापूर ता. कराड येथील सुखशांती सार्वजनिक वाचनालयास श्री मळाईदेवी विचार मंचाचे संचालक श्री शिवाजीराव धुमाळ तात्या यांनी ग्रंथदान करून, कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ,आणि कलियुगात दान ही सर्वश्रेष्ठ साधनांचा विचार करून वाचन संस्कृती टिकवण्यासाठी केलेले योगदान हे सामाजिक दृष्ट्या अतिशय मौल्यवान आहे. असे उद्धागार महाराष्ट्र शासन पुरस्कृत शेती मित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी काढले. ते पुढे बोलताना म्हणाले श्री मळाईदेवी विचार मंचच्या माध्यमातून नेहमीच आपण चांगल्या पुस्तकांवर चर्चा करत असतो. या चर्चेचा हेतू आज ख-या अर्थाने तात्या सारख्या व्यक्तींनी ग्रंथालयास ग्रंथदान करुन साध्य केला.

          आपणास माहिती असावे महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयासाठी अधिनियम १९६७ हा कायदा नागपूर येथील अधिवेशनामध्ये संमत करून कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिन१ मे १९६८ पासून लागू करण्यात आला. काळानुरूप या कायद्यात बदल होणे गरजेचे होते. परंतु तसे न होता सन २०११-१२ पासून नवीन ग्रंथालयांना मान्यता नाही किंवा जुन्या ग्रंथालयांचे दर्जाबद्दल नाहीत. अशा कठीण परिस्थितीत समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने काही ग्रंथालये चांगली चालले आहेत. तर काही ग्रंथालये नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही सर्व भयानक परिस्थिती ग्रंथालय चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक संघटना व ग्रंथालय भारती यांच्या निदर्शनास आल्यानंतर, कर्मचारी सेवा शर्ती,अनुदान वाढ, दर्जाबद्दल,कायद्यामधील दुरुस्ती, अशा अनेक समस्या वर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री नामदार चंद्रकांतजी पाटील दादा यांना वेळोवेळी निवेदन देऊन समक्ष भेटून या विषयांचा निपटारा केला. व त्यास काही अंशी यश प्राप्त होऊन थोडेफार अनुदान वाढ झाले.

         मंत्री महोदयांनी कायदा दुरुस्तीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारला असून त्यावर कारवाई करण्याची कामकाज चालू केले आहे. यांवरून असे दिसते की भावी काळात वाचन संस्कृतीला चांगले दिवस येतील व भावी पिढीस उत्कृष्ट दर्जाची व उत्कृष्ट लेखकाची पुस्तके ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

    यावेळी शिवाजीराव धुमाळ, अनिल शिर्के, डॉ.जगदिश जाधव,शेखर शिर्के, पंजाबराव पाटील,तुळशीराम शिर्के, सुहास जाधव,यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ.स्वाती थोरात,मळाईदेवी पंत संस्थेचे व्हा.चेअरमन टांकसाळे, भिमराव माहुर,अशोक पाटील, दुर्वास भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब गरुड सर यांनी केले तर आभार विश्वास निकम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .