कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.


उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी  जी.एम.पी. इन फार्मा इंडस्ट्रीज या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. 

औषध निर्माण कंपनीमध्ये कशाप्रकारे मॅन्युफॅक्चरिंग केले जाते. विविध प्रक्रिया कशा पार पाडल्या जातात. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे नक्की काय, त्याचे महत्त्व काय आहे. कोणत्या प्रकारचे नियम पाळावे लागतात, काय काळजी घ्यावी लागते. याबाबत सविस्तर माहिती ग्लेनमार्क फार्मासिटिकल फार्मास्युटिकल प्रा.लिमिटेड गोवा येथील जनरल मॅनेजर  माया नांदे यांनी दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले. 

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी माया नांदे यांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वैद्य व आभार प्रा. मोनिका चवरे यांनी  मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .