Posts

Showing posts from March, 2024

पर्यावरणपूरक प्रकल्प काळाची गरज - प्राचार्या.डॉ स्नेहल प्रभुणे.

Image
  पर्यावरणपूरक प्रकल्प काळाची गरज - प्राचार्या.डॉ स्नेहल प्रभुणे. कराड -प्रतिनिधी. महिला महाविद्यालय कराड येथे 22 मार्च जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन लोकमान्य ग्रीन क्लबच्यावतीने बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या.डॉ स्नेहल प्रभुणे मॅडम  होत्या. आपले विचार व्यक्त करताना प्राचार्या डॉ.स्नेहल प्रभुणे यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे यासाठी आपण आपल्या घरी ही अगदी साध्या पद्धतीने उदा.पाला पाचोळा यांचा वापर करून कंपोस्ट खत निर्मिती करू शकतो. पाणी हे अमृतासमान आहे त्याचा वापर जपून केला पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपण आपल्या महाविद्यालयात अभिनव उपक्रम उदा.सोलर एनर्जी,कोकेडामा ॲक्टिव्हिटी यशस्वी करणार असल्याचे मत मांडले. 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त निबंध स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थिनीचे प्रमाणपत्र आणि पेन देवून स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमास लोकमान्य ग्रीन क्लब समन्वयक प्रा.विनोद सागरे, प्रा.सचिन कर्चे,प्रा.शोभा पाटील,प्रा.किशोर ग...

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्वांना हवे: कुलगुरू

Image
  आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्वांना हवे: कुलगुरू सोलापूर विद्यापीठात तीन दिवसीय कार्यशाळेस सुरुवात. सोलापूर - प्रतिनिधी. सोलापूर विद्यापीठात तीन दिवसीय कार्यशाळेस सुरुवात झाली. कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही.  कोणत्याही ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास ती कशाप्रकारे हाताळावी अथवा काय करावे, यासंदर्भात प्रत्येकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना अधिविभाग यांच्या मार्फत आयोजित 'आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, महापालिका अग्निशमन विभागाचे अधीक्षक केदारनाथ आवटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. क...

"उजेड वाती" कविता संग्रहाची मान्यवरांना सप्रेम भेट.

Image
"उजेड वाती" कविता संग्रह मान्यवरांना कवी गुलाब मोहिते यांचे कडून सप्रेम भेट. शिराळा - प्रतिनिधी.  मा.आमदार मानसिंग भाऊ नाईक यांना कविता संग्रह भेट. कोकरुड येथील गुलाब मोहिते यांचा उजेडवाती हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी शिक्षक बॅॅंकेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित मा.आमदार मानसिंग भाऊ नाईक यांना कविता संग्रह भेट दिला.यावेळी संजय गुरव, लक्ष्मण नायकवडी, बाजीराव पाटील, शंकर करुंगलेकर ,जगन्नाथ शिंदे, सपकाळ सर ,देसाई सर उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.सत्यजीतभाऊ देशमुख यांना कविता संग्रह भेट.कोकरुड येथील कवी गुलाब मोहिते यांचा पहिला कवितासंग्रह उजेडवाती प्रकाशित झाला आहे.आदरनीय युवा नेते सत्यजित देशमुख यांना भेट देताना अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी बहुसंख्य लोक उपस्थित होते.  यशाची वाटेकरी: सौ.नुतन मोहिते.माझ्या एकंदरीत प्रवासात खंबीरपणे साथसोबत देणारी माझी अर्धांगिनी सौ.नुतन‌ मोहिते तिच्यामुळेच मी आज एक प्रतिभावान कवी म्हणून प्रसिद्ध आहे. असे मत उजेडवाती कविता संग्रहाचे कवी गुलाब मोहिते यांनी व्यक्त केले....

श्री. नारायण लोहार यांची मुख्याध्यापकपदी निवड.

Image
  श्री. नारायण लोहार  यांची              मुख्याध्यापकपदी निवड. शिराळा - प्रतिनिधी. इंग्रुळ ता शिराळा श्री. शिवशंकर विद्यालय,इंग्रुळच्या मुख्याध्यापकपदी श्री. नारायण लोहार सर यांची निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करताना , आदर्श शिक्षक श्री. राजू जाधव सर, उपक्रमशील शिक्षक श्री. विजय ठाकर सर व श्री. तानाजी जंगम उपस्थित होते.

उंडाळे येथील द्रौपदा पाटील यांचे निधन.

Image
  उंडाळे येथील  द्रौपदा पाटील यांचे निधन. उंडाळे - प्रतिनिधी.  उंडाळे  ता कराड येथील  द्रोपदा किसन पाटील यांचे वयाच्या ९२ वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात  १ मुलगा २ मुली ,सुन, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी अधिकारी दादासाहेब  पाटील  यांच्या त्या मातोश्री होत्या .तर पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे  शेवाळे यांच्या त्या आजी होत्या .रक्षा विसर्जन रविवार दिनांक 17 रोजी उंडाळे येथील वैकुंठ भूमीत सकाळी ९  वाजता होणार आहे .अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

सोनवडे ता.शिराळा येथे सतुबुवा भंडार्‍यानिम्मीत्त आयोजीत करण्यात आलेले कुस्ती मैदान उत्साहात संपन्न.

Image
  सोनवडे ता.शिराळा येथे सतुबुवा भंडार्‍यानिम्मीत्त आयोजीत कुस्ती मैदान उत्साहात संपन्न. शिराळा -प्रतिनिधी. सोनवडे ता.शिराळा येथे सतुबुवा भंडार्‍यानिम्मीत्त आयोजीत करण्यात आलेले कुस्ती मैदान उत्साहात पार पडले. या कुस्ती  मैदानाचे उद्गाटन यात्रा कमेटी व  मान्यवरांच्या उपस्थीत पार पडले या  मैदानात अनेक चटकदार कुस्त्या झाल्या यामध्ये प्रामुख्याने प्रथम क्रमाकासाठी अभिजीत भोसले व संदिप बंडगर यांच्या झालेल्या लढतीत अभिजीत भोसले याने पोकळ घिस्सा डावावर संदिप बंडगरला चितपट केले. दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत पै.सुरज पाटील याने पै.करण घोडके याला घुटना डावावर आस्मान दाखवले तर तिसर्‍या क्रमांकासाठी पै.शुभम शेणवी,पै.सुधीर जाधव यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती लढतीत पै.सचीन महागावकर याने दिनेश पवार याला चितपट केले.  या कुस्ती मैदानात  प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या यामध्ये प्रामुख्याने पै.पार्थ माने,हर्षद देसाई,अमर पाटील,साहील नांगरे,बाळकृष्ण मलगुंडे,विनायक भोसले,शुभम पाटील,भुषण पाटील, यांनी चटकदार कुस्त्या केल्या यावेळी पंच म्हणुन शिवाजी पाटील...

सांगली जिल्हा शिक्षक बॅंकेच्या वतीने गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न.

Image
  सांगली जिल्हा शिक्षक बॅंकेच्या वतीने गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. सांगली जिल्हा शिक्षक बॅंकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा.मोहनराव गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते व शिक्षक बॅंकेच्या सर्व संचालकांच्या उपस्थित कवी गुलाब मोहिते कोकरुडकर यांचा सत्कार संपन्न झाला.गुलाब विष्णू मोहिते हे जिल्हा परिषद शाळा चव्हाणवाडी ता शिराळा येथे कार्यरत आहेत.त्यांचा 'उजेडवाती' काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही कविता सादरीकरण केले आहे. आकाशवाणी सांगली केंद्रावर देखील कविता वाचनासाठी त्यांची निवड झाली होती. संभाजीनगर मध्ये पार पडलेल्या शिक्षक साहित्य संमेलनात ते सहभागी होते मुंबई सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध साहित्य संमेलनात ते सहभागी झाले आहेत.गझल, स्त्रीयांचे प्रश्न, निसर्ग, प्रेम, आई , शेती, शेतकरी, दुष्काळ अशा विविध विषयांवर  त्यांनी लेखन केले आहे.समाजाचे अनेक प्रश्न कवितेतून मांडले आहेत.त्यांचे 'हसरा रविवार हे सदर गेली चार वर्षे सुरू होते. या प्रवासात बंधू...

महिला महाविद्यालयात लोकमान्य ग्रीन क्लबच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न.

Image
  महिला महाविद्यालयात लोकमान्य ग्रीन क्लबच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न. कराड -प्रतिनिधी.           शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड येथे लोकमान्य ग्रीन क्लबच्या वतीने युवकांच्या (Youth Students) मार्फत नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पाणी बचत अभियाना अंतर्गत व 22 मार्च जागतिक जल दिना निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थीनी मध्ये पर्यावरण साक्षरता,जल साक्षरता,पाणी बचत, वीज बचत, वन्य जीव इत्यादीच्या संरक्षणाप्रति सहानभुती निर्माण करून भारतीय संविधानातील कर्तव्य क्र.७ जंगले,तलाव,नद्या, वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सजीव प्राण्याबद्दल सहानभुती बाळगणे याची जाणीव करून देणे हाच हेतू आहे. निबंध स्पर्धेत कु.धनश्री बामणे,कु.मयुरी जगताप,कु. पल्लवी यादव तर पोस्टर्स स्पर्धत कु.सोनाली चंद्र- पाटले, कु.प्राजक्ता फाळके,कु.वैष्णवी बडे तसेच रांगोळी स्पर्धेत कु.श्वेता माळी, कु.नम्रता जावीर, कु.ऋतुजा टळले या विद्य...

पाणी वाचविणे हे प्रत्येक भारतीयाचे संविधानात्मक कर्तव्य.

Image
  पाणी वाचविणे हे प्रत्येक भारतीयाचे संविधानात्मक कर्तव्य. ________प्रा.अखिलेश शिंदे. कराड -प्रतिनिधी. शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड येथे लोकमान्य ग्रीन क्लब आयोजित “युवकांच्या (Youth Students)मार्फत नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण  व पाणी बचत”अभियानाची अंमलबजावणी अंतर्गत गळक्या नळाची दुरुस्ती करणे  यावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्र विभागप्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अखिलेश शिंदे उपस्थित होते. तर अध्यक्ष स्थानी प्र.प्राचार्य डॉ. स्नेहल प्रभुणे मॅडम उपस्थित होत्या.आपले विचार मांडताना प्रा.अखिलेश शिंदे यांनी पाणी ही निसर्गाची अनमोल देणगी असून ती मानवाची मुलभूत गरज आहे. प्रत्येकाने पाणी वाचिवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या भविष्यकालीन पिढीला ही  पाणी मिळाले पाहिजे. सद्या सर्वत्र पाणी टंचाई, दुष्काळ, दुषित पाणी ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे.आपण सर्वांनी भारतीय संविधानातील कर्तव्य क्र.७ जंगले,तलाव,नद्या, वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सज...

वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात येणार डॉ.अतुलबाबा भोसले" यांच्या प्रयत्नांना यश सर्वसामान्य शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण.

Image
  वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात येणार. " डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश सर्वसामान्य शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण." ब्युरो रिपोर्ट -गोंडवाना न्यूज.             गेल्या दोन महिन्यापासून वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात सोडण्याबाबत उंडाळे, काले विभागातील शेतकऱ्यांच्या मागणी नुसार व विविध ग्रामपंचायतीचे मागणी नुसार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्याकडे व संबंधित कार्यालयशी सातत्याने पत्रव्यवहार करून, वेळप्रसंगी अतुल बाबानी स्वतः फोन वरती अधिकाऱ्यांशी बोलून, पाणी सोडण्यासाठी लागणारे वीज बिला पोटी रक्कम भरण्यासाठी पैसे देण्याची हमी य.मो.कृष्णा कारखानाचे वतीने स्वतः घेतली.          परंतु तात्काळ पाणी दक्षिण माड नदीपात्रात सोडावे यासाठी अधिकाऱ्यांना विनंती करणारे कराड दक्षिणचे भाग्यविधाते सर्वांचे लाडके नेते मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या अथक प्रयत्नाने दक्षिणमांड नदीपात्रात आज दि 08/03/2024 रोजी पाणी सोडण्यात आले.  गेले चार वर्षे सातत्याने जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मा.डॉ.अतुलबाबा भोसले या...

यशोदा शेवाळे यांनी अपार कष्टातून उभे केले आपले कुटुंब.

Image
  यशोदा शेवाळे यांनी अपार कष्टातून उभे केले आपले कुटुंब.         कराड - प्रतिनिधी. येवती ता. कराड येथील यशोदा शेवाळे यांनी अपार कष्टातून  आपला संसार फुलवला आणि आपल्या मुलांना  उच्च शिक्षण देऊन मोठे केले .त्यांचा मुलगा पत्रकार  ज्ञानेश्वर शेवाळे हा देखील सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करून समाजाची सेवा करत आहे.यशोदा शेवाळे यांचा विवाह अगदी कमी वयामध्ये येवती येथील ह .भ. प .दिवंगत महादेव   शेवाळे यांच्याशी झाला.  महादेव  शेवाळे हे सुरुवातीला मुंबई या ठिकाणी हात गाडी ओढून  आपला  उदरनिर्वाह चालत होते.कालांतराने त्यांनी वायरमन हा कोर्स करून चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवली .यावेळी संसाराचा पूर्ण गाडा हाकण्याचे काम यशोदा शेवाळे यांनी केले कधी तक्रार केली नाही की आपले पती मुंबईला असताना आपण गावाकडे  शेती करत आहोत ,वेळप्रसंगी येळगाव  येथील बाजारामध्ये  त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला ,अपार कष्ट, मेहनतीच्या जोरावर  त्यांनी आपला संसार चालवून घर उभे केले. हे करत असताना त्यांनी आपल्या दोन्ही मुला...

जगण्याची उमेद देणारी माझी कविता: गुलाब मोहिते.

Image
  जगण्याची उमेद देणारी माझी कविता: गुलाब मोहिते. शिराळा - प्रतिनिधी. शब्द निव्वळ कागदावर लिहून चालणार नाही तर ते जगताही आले पाहिजेत मी माझ्या कवितेतून सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. .त्या निश्चितच साहित्य क्षेत्राला नवा आयाम देतील असं मत गुलाब मोहिते यांनी व्यक्त केले ते डीएडच्या वर्गमित्र मैत्रिणींकडून आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. त्यांचा 'उजेडवाती' कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.यावेळी सर्वांनी मनोगते‌ व्यक्त केली. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.यावेळी शिला पाटील डॉ बिजली कुंभार वनिता पवार  सुनिता मोहिते नयना गुरव अर्चना जाधव नीता दळवी सुनिता श्रीराम स्वाती शहा अरूंधती पाटील संजय पाटील रमेश रोकडे संजय गडाळे राजू चौगुले हराळे पंडित विभुते सुनील धुमाळ अरविंद सुतार गोरख जाधव तुकाराम जावीर उपस्थित होते प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर आभार शीला पाटील यांनी मानले.

विद्यार्थ्यांनी सतत ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. ___मा. अभिजीत इंगळे.

Image
  विद्यार्थ्यांनी सतत ध्येयावर लक्ष केंद्रित करावे.                   ___मा. अभिजीत इंगळे. शिराळा - प्रतिनिधी. सैदापूर विद्यानगर येथील समाज भूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात  ग्रंथालयाचे सभासद, वाचक माजी सैनिक संदीप शामराव शेळके यांची नवी मुंबई पोलीस मध्ये नेमणूक झाली. त्याबद्दल मा.श्री अभिजीत इंगळे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी अभिजीत  इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्त्वाचे आहे . त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी, वाचन , लेखन या सर्वांमध्ये सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळतेच असे मत व्यक्त केले.  त्याप्रसंगी  संदीप शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथालयातील पुस्तकांच्या मुळे ज्ञान मिळतेच परंतु ग्रंथालयातील दैनिक व  मासिकांमधून वर्तमान काळातील परिस्थितीचा सर्वांगाने वेध घेता येतो. ग्रंथालयातील ग्रंथ  साहित्यांमुळेच  मला आज यश मिळाले आहे . याचा मला अभिमान आहे . या ग्रंथालयाने  अनेक प्रशासकीय अधिकारी घडवलेले आहेत . या कार्यक्रमा...

कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न.

Image
  कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. मा.शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख साहेब यांच्या हस्ते कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी केंद्र प्रमुख आलिशा मुलाणी यांनी सांगितले की गुलाब मोहिते सर हे इयत्ता तिसरीपासून वाचन करत आहेत.त्यामुळे त्यांची वेगळी लेखन शैली विकसित झाली आहे.शिक्षण विस्तार अधिकारी देशमुख साहेब यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्याध्यापक रघुनाथ पाटील, महादेव पाटील,संजय गुरव दिपक रोकडे संजय रोकडे दिलीप चौगुले बाजीराव पाटील मंजुशा परदेशी लोखंडे मॅडम उषा जाधव सुषमा पवार जगदीश दिंडे संजय कुंभार सत्यजित वसंत कुंभार यादव इत्यादी हजर होते आभार प्रकाश जाधव यांनी मानले .

कारगिल योध्दा प्रल्हाद ( आबा) फौजींची अकाली एक्झिट.

Image
  कारगिल योध्दा प्रल्हाद ( आबा) फौजींची अकाली एक्झिट. सर्वांना हास्य विनोदात मनमुराद हसवणारा अजातशत्रू भारतमातेचा सुपुत्र अनंतात विलीन... शिराळा -प्रतिनिधी. करमाळे (ता शिराळा) येथील  सीमा सुरक्षा दलातील हवालदार प्रल्हाद राजाराम पाटील  (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.    बी. एस. एफच्या गार्डदलाने मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,  दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक ७ रोजी आहे. श्रीकमला माधव‌ विद्यामंदिर गुढेचे मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू होत.     १९९४ साली त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला. राजस्थान, पंजाब, श्रीनगर, ग्वाल्हेर, आसाम,मिझोराम, नागालँड, मणिपूर, गुजरात आदी राज्यांत देशाच्या सीमेवर सेवा केली. सध्या ते पश्चिम बंगाल येथे कार्यरत होते. नुकतेच त्यांना प्रमोशन मिळाले होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती होऊन त्यांचे पोस्टिंग सिलीगुडी पश्चिम बंगाल येथे झाले होते. हजर होण्यासाठी मागील महिन्यात ते गुजर...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पालकांच्या निदर्शनास आणून देणे तसेच विद्यार्थी व पालक यांच्या समस्या सोडवणे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हे महत्त्वाचे आहे.  महाविद्यालयांमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये पाल्यांची प्रगती व अवलोकन करणे तसेच विद्यार्थ्यांच्या एकूण प्रगतीमध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक हे महत्त्वाचे घटक आहेत. व पालकांना या गोष्टीचे गांभीर्य असणे गरजेचे आहे यासाठी पालक सभेचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी पालकांचे स्वागत केले व पालक व विद्यार्थी यांना झालेल्या व पुढे येणाऱ्या परीक्षा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरंसन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे गुण प्रत्येक पालक व विद्यार्थ्यांना जाहीर केले व आणखी प्रगतीसाठी काय करावे लागेल यासाठी विविध गोष्ट...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्तम नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालय सतत कार्यरत असते त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने आयोजित केलेल्या अपोलो कॅम्पस ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची निवड अपोलोच्या फार्मसी विभागात  करण्यात आली. त्यामध्ये मोहिनी धुमाळ, स्नेहल कुंभार, सुवर्णा शिंदे, तनुजा पाटील, सोनाली यादव, तनया गोसावी, अक्षता चिकाटे, विक्रांत साळुंखे, प्रतीक्षा भाईगडे, प्रियांका सावंत या  विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडी करण्यासाठी अपोलोचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह अंकित भोसले, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह संतोष टेके व ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह ऑरेशन्स संतोष पसळकर हे उपस्थित होते. अंकित भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अपोलो विषयी माहिती दिली. यावेळी निवड करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील  सानिया चंद्रगडी व ऋतुजा मोहिते  या विद्यार्थिनींनी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), शिरूर जिल्हा पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय फार्मा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनींना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. सोनल सातपुते यांनी मार्गदर्शन केले. तसेच या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

शिराळा सर्वांत निराळा....

Image
  शिराळा सर्वांत निराळा. गुलाब मोहिते. सांगली जिल्ह्यातील पश्चिमेचं टोक डोंगराळी भाग,पाऊस अशी भौगोलिक परिस्थिती असणारा माझा शिराळा तालुका.अनेक‌ वाड्या वस्त्या मध्ये विखरून आहे.वारणा आणि मोरणा नद्या या तालुक्याची तहान भागवतात.चांदोली धरण, अभयारण्य, व्याघ्रप्रकल्प अनेक वैशिष्ट्ये आहेत...आज आपण आढावा घेणार आहे तो  शिक्षणक्षेत्राचा...... मी १९९७ साली बिळाशी नं १ मध्ये हजर झालो.त्याकाळी कोकरुड नं १व‌२‌‌मांगरुळ‌, मांगले, कांदे, निगडी, देववाडी, नाठवडे ,सागाव,मेणी, रांजणवाडी या शाळांचा तालुक्यात क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा मध्ये मोठा दबदबा होता.जिल्हा पातळीवर जाऊन अनेक क्रमांक तेव्हा या शाळांनी मिळवले होते.विशेष‌‌ करून आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे पावणे गुरुंजींचा... कोकरुड नं 2 ला मुख्याध्यापक असताना अनेक वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता..एन डी पाटील, सूर्यकांत कदम मांगले बळीराम सुतार के के चौगुले डीवाय पाटील संजय चरापले जालिंदर पाटील उत्तम कदम अशी काही जुनी मंडळींचा उल्लेख अनिवार्य आहे.महिलाही अग्रेसर होत्या बिळाशी मधील दाईंगडे बाई सातपुते बाई पाटील बाई याच क...

काळजाला हात घालते ती खरी कविता. _______कवी गुलाब मोहिते.

Image
  काळजाला हात घालते ती खरी कविता.          _______कवी गुलाब मोहिते. शिराळा - प्रतिनिधी. जिल्हा परिषद शाळा खुजगांवच्या वतीने कवी गुलाब मोहिते यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या सत्कार समारंभात त्यांनी आपल्या कविता संग्रहाच्या साहित्य विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचा  "उजेडवाती"  कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आलीशा मुलाणी, बाजीराव घोडे, शंकर करूंगलेकर, उषा जाधव क्रांती पाटणकर उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले व आभार प्रदर्शन लक्ष्मण नायकवडी यांनी केले.

पर्यावरण संरक्षणामध्ये महाविद्यालयीन युवतींची भूमिका महत्वाची. ____डॉ.पराग सोनटक्के

Image
  पर्यावरण संरक्षणामध्ये महाविद्यालयीन युवतींची भूमिका महत्वाची.                       ____डॉ.पराग सोनटक्के.  कराड -प्रतिनिधी. शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय,कराड येथे  22 मार्च जागतिक जल दिनाचे औचित्य साधून लोकमान्य ग्रीन क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भित्ती पत्रिकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी विशेष उपस्थिती प्रा.विलास सुर्वे,प्रा.अखिलेश शिंदे यांची होती.  यावेळी विचार व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ.सोनटक्के सर यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशिल राहिले पाहिजे जेणेकरून शाश्वत विकासचे उद्दिष्ट साध्य करता येईल. "Water for Peace"शांतते साठी पाणी 2024 ही संकल्पना घेवुन सर्वांनी नैसर्गीक संसाधनाचा पर्याप्त वापर केला पाहिजे. या भित्ती पत्रिका स्पर्धेत अनेक विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास प्रो.डॉ.आय.डी.जोगी,  डॉ .पी.बी.दरुरे, डॉ.मोहळकर,प्रा.एस.बी.जगताप, प्रा.आर.बी.पवार,प्रा.एस.डी.गाव...

हातकणंगले लोकसभेत परिवर्तन घडवून वैचारिक व सामाजिक जाण असणारी व्यक्ती प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांना संधी द्या.

Image
  हातकणंगले लोकसभेत परिवर्तन घडवून वैचारिक व सामाजिक जाण असणारी व्यक्ती प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांना संधी द्या. ______सौ. मेघना गावडे.   कोल्हापूर - प्रतिनिधी.          एकदा खासदार झाले की पाच वर्ष मतदारांचे तोंड पहायचे नाहीं.निवडणूक जवळ आली की उद्घाटन करत आश्वासन देत फिरायचे.अशा व्यक्तीस परत परत संधी द्यायची काय?सध्याचं राजकारण हे फार किळसवाणं झालं आहे. सगळीकडे महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरु झालंय. काही आमदार खासदार तर बेधडकपणे चुकीची स्टेजवरुन वक्तव्ये करतात. काही नेते पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहेत. पण या सगळ्या राजकारणात सामान्य माणूस भरडला जातोय. आपण ज्यांना निवडणून दिले ते गेली पाच वर्षे स्थिर नाहीत. आता पुन्हा यावेळी देखील तेच करायचय का? आपल्याला हवाय शिक्षित आणि समाजाचे हित जाणणारा उमेदवार. आपल्याच हक्काच्या उमेदवाराला म्हणजे प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांना पाठिंबा देऊ आणि येणारा काळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेऊ. प्रा. डॉ. संतोष कोळेकर या शिक्षित, आणि कायदेपंडित व्यक्तीला हातकणंगले लोकसभेतून खासदार बनवू.   ...

महिला महाविद्यालय कराड येथे माझी वसुंधरा अभियानाचे मार्गदर्शन संपन्न.

Image
  महिला महाविद्यालय कराड येथे माझी वसुंधरा अभियानाचे मार्गदर्शन संपन्न. कराड - प्रतिनिधी.        शिक्षण मंडळ कराड संचलित  महिला महाविद्यालय कराड येथे लोकमान्य ग्रीन क्लब  व  कराड नगरपरिषद कराड (ग्रीनी टीम) यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान, वृक्षारोपण, स्वच्छता, आणि पर्यावरण जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कराड नगरपरिषदेचे “माझी वसुंधरा अभियानाचे” पदाधिकारी .कल्याणी पवार, दिपाली कदम ,आफ्रिन दिवाण ,मनिषा चव्हाण,अजिंक्य मोरे ,रोहन सूर्यवंशी ( ग्रीनी टीम )यांनी बी.कॉम भाग 1,2,3 आणि बी ए.1 च्या क्लास रूममध्ये जावून विद्यार्थांना मार्गदर्शन केले . यावेळी  विद्यार्थ्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन कसे करावे यासाठी विविध फ्लेक्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.”प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा”.  विजेचा वापर कमी करा . क्लास मधील गरजेनुसार फॅन वापरणे, ट्यूब लाईट वापरणे,याविषशी अनमोल मार्गदर्शन केले .तसेच रामफळ, चींच यांचे वृक्षारोपण प्राचार्या डॉ. स्नेहल प्रभुणे मॅडम, उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के,रा....