महिला महाविद्यालय कराड येथे माझी वसुंधरा अभियानाचे मार्गदर्शन संपन्न.
महिला महाविद्यालय कराड येथे माझी वसुंधरा अभियानाचे मार्गदर्शन संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड येथे लोकमान्य ग्रीन क्लब व कराड नगरपरिषद कराड (ग्रीनी टीम) यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान, वृक्षारोपण, स्वच्छता, आणि पर्यावरण जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कराड नगरपरिषदेचे “माझी वसुंधरा अभियानाचे” पदाधिकारी .कल्याणी पवार, दिपाली कदम ,आफ्रिन दिवाण ,मनिषा चव्हाण,अजिंक्य मोरे ,रोहन सूर्यवंशी ( ग्रीनी टीम )यांनी बी.कॉम भाग 1,2,3 आणि बी ए.1 च्या क्लास रूममध्ये जावून विद्यार्थांना मार्गदर्शन केले . यावेळी विद्यार्थ्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन कसे करावे यासाठी विविध फ्लेक्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.”प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा”. विजेचा वापर कमी करा . क्लास मधील गरजेनुसार फॅन वापरणे, ट्यूब लाईट वापरणे,याविषशी अनमोल मार्गदर्शन केले .तसेच रामफळ, चींच यांचे वृक्षारोपण प्राचार्या डॉ. स्नेहल प्रभुणे मॅडम, उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के,रा. से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. अखिलेश शिंदे. यांचा शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमान्य ग्रीन क्लबचे प्रा.विनोद सागरे,प्रा.सचिन कर्चे,प्रा.भक्ती भालधरे,प्रा.शोभा पाटील,प्रा. स्वप्ना केतकर प्रा.किशोर गुजर व ग्रीन क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी संदीप पवार सौ.लोहार यांच्या सोबत अनेक विद्यार्थिनी ची उपस्थिती होती.

Comments
Post a Comment