पाणी वाचविणे हे प्रत्येक भारतीयाचे संविधानात्मक कर्तव्य.
पाणी वाचविणे हे प्रत्येक भारतीयाचे संविधानात्मक कर्तव्य. ________प्रा.अखिलेश शिंदे.
कराड -प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड येथे लोकमान्य ग्रीन क्लब आयोजित “युवकांच्या (Youth Students)मार्फत नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पाणी बचत”अभियानाची अंमलबजावणी अंतर्गत गळक्या नळाची दुरुस्ती करणे यावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्र विभागप्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अखिलेश शिंदे उपस्थित होते. तर अध्यक्ष स्थानी प्र.प्राचार्य डॉ. स्नेहल प्रभुणे मॅडम उपस्थित होत्या.आपले विचार मांडताना प्रा.अखिलेश शिंदे यांनी पाणी ही निसर्गाची अनमोल देणगी असून ती मानवाची मुलभूत गरज आहे. प्रत्येकाने पाणी वाचिवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या भविष्यकालीन पिढीला ही पाणी मिळाले पाहिजे. सद्या सर्वत्र पाणी टंचाई, दुष्काळ, दुषित पाणी ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे.आपण सर्वांनी भारतीय संविधानातील कर्तव्य क्र.७ जंगले,तलाव,नद्या, वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सजीव प्राण्याबद्दल सहानभुती बाळगणे अपेक्षित आहे. याचबरोबर प्र.प्राचार्य डॉ. स्नेहल प्रभुणे मॅडम save water save life संदेश दिला. सदर सत्रास ग्रीन क्लब चे समन्वयक, पदाधिकारी सदस्य, विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्ना केतकर यांनी केले तर आभार प्रा.भक्ती भालदारे तचे सूत्रसंचलन प्रा. सचिन कर्चे यांनी केले.

Comments
Post a Comment