यशोदा शेवाळे यांनी अपार कष्टातून उभे केले आपले कुटुंब.
यशोदा शेवाळे यांनी अपार कष्टातून उभे केले आपले कुटुंब.
कराड - प्रतिनिधी.
येवती ता. कराड येथील यशोदा शेवाळे यांनी अपार कष्टातून आपला संसार फुलवला आणि आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मोठे केले .त्यांचा मुलगा पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे हा देखील सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करून समाजाची सेवा करत आहे.यशोदा शेवाळे यांचा विवाह अगदी कमी वयामध्ये येवती येथील ह .भ. प .दिवंगत महादेव शेवाळे यांच्याशी झाला. महादेव शेवाळे हे सुरुवातीला मुंबई या ठिकाणी हात गाडी ओढून आपला उदरनिर्वाह चालत होते.कालांतराने त्यांनी वायरमन हा कोर्स करून चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवली .यावेळी संसाराचा पूर्ण गाडा हाकण्याचे काम यशोदा शेवाळे यांनी केले कधी तक्रार केली नाही की आपले पती मुंबईला असताना आपण गावाकडे शेती करत आहोत ,वेळप्रसंगी येळगाव येथील बाजारामध्ये त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला ,अपार कष्ट, मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपला संसार चालवून घर उभे केले. हे करत असताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सिंधू मनोहर सत्रे आणि पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना उच्च शिक्षण देऊन समाजामध्ये ताठ मानेने जगायचे शिकवले, त्यांचे माहेर उंडाळे येथील आहे.किसन पाटील यांच्या त्या कन्या आहेत. छोट्याशा झोपडीत राहून यशोदा शेवाळे यांनी दिवस काढले. पती महादेव शेवाळे हे मुंबईला कामानिमित्त वास्तव्यास होते अशा परिस्थितीमध्ये एकट्याने आपल्या संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली .आज वयाच्या 75 वर्षे देखील यशोदा शेवाळे या तितक्याच ताकतीने आपल्या कुटुंबासाठी मेहनत घेत आहेत.अजून सुद्धा या कुटुंबामध्ये त्यांचा शब्द हेच प्रमाण मानले जाते. त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट केली जात नाही .आदर्श माता, आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श नारी याचे एकमेव उदाहरण म्हणजे यशोदा शेवाळे होय ..जागतिक महिला दिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो.

Comments
Post a Comment