सांगली जिल्हा शिक्षक बॅंकेच्या वतीने गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न.

 सांगली जिल्हा शिक्षक बॅंकेच्या वतीने गुलाब मोहिते यांचा सत्कार संपन्न.


शिराळा - प्रतिनिधी.

सांगली जिल्हा शिक्षक बॅंकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा.मोहनराव गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते व शिक्षक बॅंकेच्या सर्व संचालकांच्या उपस्थित कवी गुलाब मोहिते कोकरुडकर यांचा सत्कार संपन्न झाला.गुलाब विष्णू मोहिते हे जिल्हा परिषद शाळा चव्हाणवाडी ता शिराळा येथे कार्यरत आहेत.त्यांचा 'उजेडवाती' काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही कविता सादरीकरण केले आहे. आकाशवाणी सांगली केंद्रावर देखील कविता वाचनासाठी त्यांची निवड झाली होती. संभाजीनगर मध्ये पार पडलेल्या शिक्षक साहित्य संमेलनात ते सहभागी होते मुंबई सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध साहित्य संमेलनात ते सहभागी झाले आहेत.गझल, स्त्रीयांचे प्रश्न, निसर्ग, प्रेम, आई , शेती, शेतकरी, दुष्काळ अशा विविध विषयांवर  त्यांनी लेखन केले आहे.समाजाचे अनेक प्रश्न कवितेतून मांडले आहेत.त्यांचे 'हसरा रविवार हे सदर गेली चार वर्षे सुरू होते. या प्रवासात बंधू सुनिल मोहिते सुविध्य पत्नी सौ.नुतन मोहिते मित्र परिवार यांचा सिंहांचा वाटा आहे.केंद्र प्रमुख आलिशा मुलाणी शिक्षण विस्तार अधिकारी श्री देशमुख साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिराळा श्री मलगुंडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सांगली जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक सभासद बंधू भगिनी त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .