महिला महाविद्यालयात लोकमान्य ग्रीन क्लबच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न.
महिला महाविद्यालयात लोकमान्य ग्रीन क्लबच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न.
कराड -प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड येथे लोकमान्य ग्रीन क्लबच्या वतीने युवकांच्या (Youth Students) मार्फत नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पाणी बचत अभियाना अंतर्गत व 22 मार्च जागतिक जल दिना निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थीनी मध्ये पर्यावरण साक्षरता,जल साक्षरता,पाणी बचत, वीज बचत, वन्य जीव इत्यादीच्या संरक्षणाप्रति सहानभुती निर्माण करून भारतीय संविधानातील कर्तव्य क्र.७ जंगले,तलाव,नद्या, वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सजीव प्राण्याबद्दल सहानभुती बाळगणे याची जाणीव करून देणे हाच
हेतू आहे. निबंध स्पर्धेत कु.धनश्री बामणे,कु.मयुरी जगताप,कु. पल्लवी यादव तर पोस्टर्स स्पर्धत कु.सोनाली चंद्र-
पाटले, कु.प्राजक्ता फाळके,कु.वैष्णवी बडे तसेच रांगोळी स्पर्धेत कु.श्वेता माळी, कु.नम्रता जावीर, कु.ऋतुजा टळले या विद्यार्थीनी नी यश मिळविले.महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.प्रभुणे मॅडम, उपप्राचार्य डॉ.सोनटक्के सर यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.ग्रीन क्लब समन्वयक प्रा.विनोद सागरे,प्रा.सचिन कर्चे,प्रा.भक्ती भालदारे,प्रा.शोभा पाटील,प्रा.किशोर गुजर,प्रा.स्वप्ना केतकर,युथ प्रेसिडेंट कु.रोझाना मुजावर यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.



Comments
Post a Comment