विद्यार्थ्यांनी सतत ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. ___मा. अभिजीत इंगळे.

 

विद्यार्थ्यांनी सतत ध्येयावर लक्ष केंद्रित करावे.
                  ___मा. अभिजीत इंगळे.

शिराळा - प्रतिनिधी.

सैदापूर विद्यानगर येथील समाज भूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात  ग्रंथालयाचे सभासद, वाचक माजी सैनिक संदीप शामराव शेळके यांची नवी मुंबई पोलीस मध्ये नेमणूक झाली. त्याबद्दल मा.श्री अभिजीत इंगळे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.

त्याप्रसंगी अभिजीत  इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्त्वाचे आहे . त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी, वाचन , लेखन या सर्वांमध्ये सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळतेच असे मत व्यक्त केले. 

त्याप्रसंगी  संदीप शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथालयातील पुस्तकांच्या मुळे ज्ञान मिळतेच परंतु ग्रंथालयातील दैनिक व  मासिकांमधून वर्तमान काळातील परिस्थितीचा सर्वांगाने वेध घेता येतो. ग्रंथालयातील ग्रंथ  साहित्यांमुळेच  मला आज यश मिळाले आहे . याचा मला अभिमान आहे . या ग्रंथालयाने  अनेक प्रशासकीय अधिकारी घडवलेले आहेत . या कार्यक्रमास माजी सैनिक धनाजी मोहिते, योगेश ठोंबरे, रविराज होवाळ, सीमा कांबळे ग्रंथालयाचे वाचक सभासद उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना  नदाफ यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .