कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पालकांच्या निदर्शनास आणून देणे तसेच विद्यार्थी व पालक यांच्या समस्या सोडवणे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयांमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये पाल्यांची प्रगती व अवलोकन करणे तसेच विद्यार्थ्यांच्या एकूण प्रगतीमध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक हे महत्त्वाचे घटक आहेत. व पालकांना या गोष्टीचे गांभीर्य असणे गरजेचे आहे यासाठी पालक सभेचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी पालकांचे स्वागत केले व पालक व विद्यार्थी यांना झालेल्या व पुढे येणाऱ्या परीक्षा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरंसन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे गुण प्रत्येक पालक व विद्यार्थ्यांना जाहीर केले व आणखी प्रगतीसाठी काय करावे लागेल यासाठी विविध गोष्टींचे मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. श्रद्धा वैद्य यांनी केले.

Comments
Post a Comment