शिराळा सर्वांत निराळा....
शिराळा सर्वांत निराळा.
गुलाब मोहिते.
सांगली जिल्ह्यातील पश्चिमेचं टोक डोंगराळी भाग,पाऊस अशी भौगोलिक परिस्थिती असणारा माझा शिराळा तालुका.अनेक वाड्या वस्त्या मध्ये विखरून आहे.वारणा आणि मोरणा नद्या या तालुक्याची तहान भागवतात.चांदोली धरण, अभयारण्य, व्याघ्रप्रकल्प अनेक वैशिष्ट्ये आहेत...आज आपण आढावा घेणार आहे तो
शिक्षणक्षेत्राचा......
मी १९९७ साली बिळाशी नं १ मध्ये हजर झालो.त्याकाळी कोकरुड नं १व२मांगरुळ, मांगले, कांदे, निगडी, देववाडी, नाठवडे ,सागाव,मेणी, रांजणवाडी या शाळांचा तालुक्यात क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा मध्ये मोठा दबदबा होता.जिल्हा पातळीवर जाऊन अनेक क्रमांक तेव्हा या शाळांनी मिळवले होते.विशेष करून आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे पावणे गुरुंजींचा... कोकरुड नं 2 ला मुख्याध्यापक असताना अनेक वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता..एन डी पाटील, सूर्यकांत कदम मांगले बळीराम सुतार के के चौगुले डीवाय पाटील संजय चरापले जालिंदर पाटील उत्तम कदम अशी काही जुनी मंडळींचा उल्लेख अनिवार्य आहे.महिलाही अग्रेसर होत्या बिळाशी मधील दाईंगडे बाई सातपुते बाई पाटील बाई याच काळात तालुक्यात अनेक महिला शिक्षिका कार्यरत होत्या चरापले बाई धर्माधिकारी बाई धस बाई मांगरूळ कुसुम मोहिते कमल मोहिते ही काही प्रतिनिधित्व करणारी नावे.. ...
शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक परंपरा कायम ठेवली आहे.. विश्वास कुंभार.. प्रकाश सावंत.. अरूण पाटील झिमूर सर संजय पाटील ही वाटचाल कायम आहे... सध्याच्या काळात तालुक्यात अनेक शिक्षक विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यामध्ये साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे बाबासाहेब परीट सर महाराष्ट्रातील प्रख्यात कथाकार म्हणून ते ओळखले जातात आणि ते शिक्षक आहेत याचा सर्वांना अभिमान आहे.. महादेव हवालदार दंडवते मॅडम ढेकळे सर निवास लोखंडे तराळ सर लोकरे सर हे ही नवोदित साहित्यिक लिहीत आहेत.लोकरे सर वक्ते कथाकार किर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत.अनंत सपकाळ यांनीही नावलौकिक मिळविला आहे. काही सुलेखनकार आहेत.मदने सर निवास लोखंडे लक्ष्मण नायकवडी ही विशेष नावं.......
उच्च शिक्षण पदवी प्राप्त डाकोरे सर दादासाहेब खोत सर सचिन बाबर सर सेटनेट उत्तीर्ण झाले आहेत. अनेक उपक्रमशील शिक्षक कार्यरत आहेत त्यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये जिल्हा पातळीवर जाऊन यश मिळवलेले सर्जेराव मोहिते अरविंद सुतार सर मोहन पवार सर करुणा मोहिते मंजुशा परदेशी इत्यादी मंडळी आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य दिपककुमार कांबळे डाकरे सर अविनाश पाटील संजय कुंभार बाजीराव पाटील संजय गुरव तिके सर ही मंडळी कार्यरत आहेत.. स्काऊट चळवळीत विशेष अभिनंदन म्हणजे आताच दिल्लीला जाऊन आलेल्या मेघा लोहार व नंदकुमार पाटील सर......
विज्ञान प्रदर्शनातूनही विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे मोहिते मॅडम ज्या राज्य विभागीय स्तरावर गेल्या आहेत.आताच मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियान मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला त्या शाळा अनुक्रमे शिराळा खुर्द सिद्धार्थनगर आरळा व निगडी विशेष कामगिरी केली आहे. या शाळांतील सर्वांचे अभिनंदन. मोहन पवार सर... संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी पेपरमधील बातम्यांमधून शाळेची मान उंचावलीच पण शिराळा तालुका जिल्हा पातळीवर कायम अग्रेसर राखला आहे. .....
क्रिडा स्पर्धेतूनही चमकदार कामगिरी होत असते अजून काही उल्लेखनीय नावं आहेत ती म्हणजे सुनिल मोहिते नुतन मोहिते प्रकाश जाधव संजय पाटील प्रताप सावंत रेश्मा भंडारे सुनिता पाटील सदा बापू पाटील आकाराम पाटील दिलीप चौगुले अरविंद देसाई प्रतिभा दळवी विठ्ठल घोडे शंकर करूंगलेकर सुदर्शन भंडारे तमेजबी अत्तार उषा जाधव विलास घागरे जगदीश दिंडे प्रज्ञा जाधव जयश्री कांबळे तानाजी खोत सर वसंत कुंभार सुनिल गुरव बानकर सर विठ्ठल घोडे मारुती साळवी संजय रोकडे ही काही प्रतिनिधित्व करणारी नावे आहेत.....
या सर्वांना सदैव प्रेरणा देणारे केंद्र प्रमुख आलीशा मुलाणी घोडे सर रोकडे सर शिक्षण विस्तार अधिकारी देशमुख साहेब डी के गोसावी जगन्नाथ पाटील बाबासाहेब कांबळे व इतर सर्व बी आर सी स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचे आपले गटशिक्षणाधिकारी श्री मलगुंडे साहेब ही सर्व मंडळी सदैव पाठीशी आहेतच... अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला माझा शिराळा तालुका खरोखरच निराळा आहे......
______गुलाब मोहिते.


Comments
Post a Comment