कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड.


उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्तम नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालय सतत कार्यरत असते त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने आयोजित केलेल्या अपोलो कॅम्पस ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची निवड अपोलोच्या फार्मसी विभागात  करण्यात आली. त्यामध्ये मोहिनी धुमाळ, स्नेहल कुंभार, सुवर्णा शिंदे, तनुजा पाटील, सोनाली यादव, तनया गोसावी, अक्षता चिकाटे, विक्रांत साळुंखे, प्रतीक्षा भाईगडे, प्रियांका सावंत या  विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या निवडी करण्यासाठी अपोलोचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह अंकित भोसले, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह संतोष टेके व ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह ऑरेशन्स संतोष पसळकर हे उपस्थित होते. अंकित भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अपोलो विषयी माहिती दिली. यावेळी निवड करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा  डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .