पर्यावरणपूरक प्रकल्प काळाची गरज - प्राचार्या.डॉ स्नेहल प्रभुणे.
पर्यावरणपूरक प्रकल्प काळाची गरज - प्राचार्या.डॉ स्नेहल प्रभुणे.
कराड -प्रतिनिधी.
महिला महाविद्यालय कराड येथे 22 मार्च जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन लोकमान्य ग्रीन क्लबच्यावतीने बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या.डॉ स्नेहल प्रभुणे मॅडम होत्या. आपले विचार व्यक्त करताना प्राचार्या डॉ.स्नेहल प्रभुणे यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे यासाठी आपण आपल्या घरी ही अगदी साध्या पद्धतीने उदा.पाला पाचोळा यांचा वापर करून कंपोस्ट खत निर्मिती करू शकतो. पाणी हे अमृतासमान आहे त्याचा वापर जपून केला पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपण आपल्या महाविद्यालयात अभिनव उपक्रम उदा.सोलर एनर्जी,कोकेडामा ॲक्टिव्हिटी यशस्वी करणार असल्याचे मत मांडले. 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त निबंध स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थिनीचे प्रमाणपत्र आणि पेन देवून स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमास लोकमान्य ग्रीन क्लब समन्वयक प्रा.विनोद सागरे, प्रा.सचिन कर्चे,प्रा.शोभा पाटील,प्रा.किशोर गुजर,प्रा.स्वप्ना केतकर, हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भक्ती भालदारे तर आभार प्रा.सचिन कर्चे यांनी मानले. या कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थीनी,आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment