हातकणंगले लोकसभेत परिवर्तन घडवून वैचारिक व सामाजिक जाण असणारी व्यक्ती प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांना संधी द्या.

 हातकणंगले लोकसभेत परिवर्तन घडवून वैचारिक व सामाजिक जाण असणारी व्यक्ती प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांना संधी द्या.
______सौ. मेघना गावडे.

 कोल्हापूर - प्रतिनिधी.

         एकदा खासदार झाले की पाच वर्ष मतदारांचे तोंड पहायचे नाहीं.निवडणूक जवळ आली की उद्घाटन करत आश्वासन देत फिरायचे.अशा व्यक्तीस परत परत संधी द्यायची काय?सध्याचं राजकारण हे फार किळसवाणं झालं आहे. सगळीकडे महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरु झालंय. काही आमदार खासदार तर बेधडकपणे चुकीची स्टेजवरुन वक्तव्ये करतात. काही नेते पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहेत. पण या सगळ्या राजकारणात सामान्य माणूस भरडला जातोय. आपण ज्यांना निवडणून दिले ते गेली पाच वर्षे स्थिर नाहीत. आता पुन्हा यावेळी देखील तेच करायचय का? आपल्याला हवाय शिक्षित आणि समाजाचे हित जाणणारा उमेदवार. आपल्याच हक्काच्या उमेदवाराला म्हणजे प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांना पाठिंबा देऊ आणि येणारा काळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेऊ. प्रा. डॉ. संतोष कोळेकर या शिक्षित, आणि कायदेपंडित व्यक्तीला हातकणंगले लोकसभेतून खासदार बनवू.

           प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांनी ओबीसी, धनगर व मराठा आरक्षणसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला, मेंढपाळ, गोरगरीब जनतेला सहकार्य केले आहे. ते स्वतः उच्च शिक्षित, स्वच्छ चारित्र्य, निःस्वार्थी, अहंकारशून्य, सामाजिक जाण असणारे आणि अनेक विषय प्रखरतेने मांडणारे व्यक्तित्व आहे. कोविड काळात त्यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांना सहकार्य केले आहे. महापुरात घुसून लोकांना वाचवले आहे. त्यावेळी अनेक परिवाराना त्यांनी अन्नधान्य वाटप केले आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व नेट/सेट उत्तीर्ण झाले आहेत. ते शिक्षक,प्राध्यापक,शेतकरी,कामगार व बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांनी गोरगरिबांची मुले शिक्षित होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सामाजिक प्रश्नावर त्यांनी अनेक निवेदने दिली आहेत. आंदोलने केली आहेत. मोर्चा काढले आहेत. सामाजिक विकासासाठी दोनशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. ही व्यक्ती हातकणंगले लोकसभा मतदार संघात विकास करू शकते. त्यामुळे सर्वांनी अशा व्यक्तिमत्त्वास संसदेत पाठवावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .