सोनवडे ता.शिराळा येथे सतुबुवा भंडार्यानिम्मीत्त आयोजीत करण्यात आलेले कुस्ती मैदान उत्साहात संपन्न.
सोनवडे ता.शिराळा येथे सतुबुवा भंडार्यानिम्मीत्त आयोजीत कुस्ती मैदान उत्साहात संपन्न.
शिराळा -प्रतिनिधी.
सोनवडे ता.शिराळा येथे सतुबुवा भंडार्यानिम्मीत्त आयोजीत करण्यात आलेले कुस्ती मैदान उत्साहात पार पडले. या कुस्ती मैदानाचे उद्गाटन यात्रा कमेटी व मान्यवरांच्या उपस्थीत पार पडले या मैदानात अनेक चटकदार कुस्त्या झाल्या यामध्ये प्रामुख्याने प्रथम क्रमाकासाठी अभिजीत भोसले व संदिप बंडगर यांच्या झालेल्या लढतीत अभिजीत भोसले याने पोकळ घिस्सा डावावर संदिप बंडगरला चितपट केले.
दुसर्या क्रमांकाच्या कुस्तीत पै.सुरज पाटील याने पै.करण घोडके याला घुटना डावावर आस्मान दाखवले तर तिसर्या क्रमांकासाठी पै.शुभम शेणवी,पै.सुधीर जाधव यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती लढतीत पै.सचीन महागावकर याने दिनेश पवार याला चितपट केले.
या कुस्ती मैदानात प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या यामध्ये प्रामुख्याने पै.पार्थ माने,हर्षद देसाई,अमर पाटील,साहील नांगरे,बाळकृष्ण मलगुंडे,विनायक भोसले,शुभम पाटील,भुषण पाटील, यांनी चटकदार कुस्त्या केल्या यावेळी पंच म्हणुन शिवाजी पाटील,संपत पाटील,राहुल जाधव,महेश पाटील,अशोक सावंत,प्रकाश काळे,दिनेश जाधव,धनाजी जाधव, मैदानासाठी पै. संपत जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या मैदानासाठी शामराव नाईक,युवराज नाईक, विलास नांगरे,सुधीर बाबर,वसंत मोहीते,सचीन नाईक,प्रताप नाईक,सुर्यकांत नाईक,सर्जेराव नाईक,संतोष नाईक,मिलींद नाईक,
दत्तात्रय नाईक,संजय जाधव, विजय जाधव,गणेश नाईक,विजय नाईक, बाबुराव नांगरे, यांचेसह सोनवडे ग्रामस्थ व कुस्ती शौकीन उपस्थीत होते. या कुस्ती मैदानाचे समालोचन- सुरेश जाधव तर हालगीवादक-मारुती मोरे गारगोटी खानापुर यांचे ग्रुपने मैदानात रंगत भरली.

Comments
Post a Comment