पर्यावरण संरक्षणामध्ये महाविद्यालयीन युवतींची भूमिका महत्वाची. ____डॉ.पराग सोनटक्के
पर्यावरण संरक्षणामध्ये महाविद्यालयीन युवतींची भूमिका महत्वाची.
____डॉ.पराग सोनटक्के.
कराड -प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय,कराड येथे 22 मार्च जागतिक जल दिनाचे औचित्य साधून लोकमान्य ग्रीन क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भित्ती पत्रिकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विशेष उपस्थिती प्रा.विलास सुर्वे,प्रा.अखिलेश शिंदे यांची होती. यावेळी विचार व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ.सोनटक्के सर यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशिल राहिले पाहिजे जेणेकरून शाश्वत विकासचे उद्दिष्ट साध्य करता येईल. "Water for Peace"शांतते साठी पाणी 2024 ही संकल्पना घेवुन सर्वांनी नैसर्गीक संसाधनाचा पर्याप्त वापर केला पाहिजे. या भित्ती पत्रिका स्पर्धेत अनेक विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास प्रो.डॉ.आय.डी.जोगी, डॉ.पी.बी.दरुरे, डॉ.मोहळकर,प्रा.एस.बी.जगताप,प्रा.आर.बी.पवार,प्रा.एस.डी.गावडे,प्रा.के.एस.गुजर,प्रा.बी.एस.भालधरे,प्रा.कर्चे,प्रा.भोसले,प्रा.सागरे,प्रा.केतकर,प्रा.काटकर यांच्यासह श्री.भैरू कोळी,श्री.संदीप पवार सौ.लोहार, जयंता ढगाले उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीन क्लब युवा अध्यक्ष कु.रोझाना मुजावर तर आभार प्रदर्शन प्रा.शोभा पाटील यांनी मानले.


Comments
Post a Comment