कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाचा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील सानिया चंद्रगडी व ऋतुजा मोहिते  या विद्यार्थिनींनी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), शिरूर जिल्हा पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय फार्मा मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनींना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले.

या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. सोनल सातपुते यांनी मार्गदर्शन केले.तसेच या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .