"उजेड वाती" कविता संग्रहाची मान्यवरांना सप्रेम भेट.
"उजेड वाती" कविता संग्रह मान्यवरांना कवी गुलाब मोहिते यांचे कडून सप्रेम भेट.
मा.आमदार मानसिंग भाऊ नाईक यांना कविता संग्रह भेट. कोकरुड येथील गुलाब मोहिते यांचा उजेडवाती हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी शिक्षक बॅॅंकेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित मा.आमदार मानसिंग भाऊ नाईक यांना कविता संग्रह भेट दिला.यावेळी संजय गुरव, लक्ष्मण नायकवडी, बाजीराव पाटील, शंकर करुंगलेकर ,जगन्नाथ शिंदे, सपकाळ सर ,देसाई सर उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.सत्यजीतभाऊ देशमुख यांना कविता संग्रह भेट.कोकरुड येथील कवी गुलाब मोहिते यांचा पहिला कवितासंग्रह उजेडवाती प्रकाशित झाला आहे.आदरनीय युवा नेते सत्यजित देशमुख यांना भेट देताना अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी बहुसंख्य लोक उपस्थित होते.
यशाची वाटेकरी: सौ.नुतन मोहिते.माझ्या एकंदरीत प्रवासात खंबीरपणे साथसोबत देणारी माझी अर्धांगिनी सौ.नुतन मोहिते तिच्यामुळेच मी आज एक प्रतिभावान कवी म्हणून प्रसिद्ध आहे. असे मत उजेडवाती कविता संग्रहाचे कवी गुलाब मोहिते यांनी व्यक्त केले.
शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा करूणा मोहिते यांना कविता संग्रह भेट. कोकरुड येथील कवी गुलाब मोहिते यांचा पहिला कवितासंग्रह उजेडवाती प्रकाशित झाला आहे.कविता अनेकविध विषयांवर असून महिलांच्या अनेक समस्या अडचणी परखडपणे मांडून त्यांची बाजू भक्कमपणे समाजासमोर मांडली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




Comments
Post a Comment