कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केड समोरील भुयारी मार्ग बंद होणार अपघात रोखण्यासाठी निर्णय: हरकती असल्यास 7 दिवसांत लेखी म्हणणे सादर करण्याचे पोलीसांचे आवाहन.

 कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केड समोरील भुयारी मार्ग बंद होणार अपघात रोखण्यासाठी निर्णय.

"हरकती असल्यास 7 दिवसांत लेखी म्हणणे सादर करण्याचे पोलीसांचे आवाहन."


कराड - प्रतिनिधि,

येथील कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केड समोर महामार्गाखाली असणारा भुयारी मार्ग (मोरी) वाहतुकीला धोकादायक बनत असल्याने सदरचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस,महामार्ग पोलिस, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने घेतला असून याबाबत कोणाची काही हरकत असल्यास आपले लेखी म्हणणे सात दिवसात  वाहतूक नियंत्रण शाखेकडे सादर करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या  सहाय्यक पोलीस निरिक्षक सरोजनी पाटील यांनी केले आहे.

 शहराजवळील  पुणे ते कोल्हापूर व कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्ग जात असून शहराच्या विस्तारीकरणामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस नागरी वस्ती,व्यवसायिक वाढले आहेत. शहर व परिसरातील नागरिकांना शहरात येण्या-जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो, शिवाय पादचारी व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.शहरात येणाऱ्या वाहनांना  कोल्हापूर नाका येथूनच मुख्य प्रवेश असल्याने व कराड मधून साताराकडे

जाण्याकरीता कोल्हापूर नाका व पंकज लॉन, कराड हॉस्पिटल समोरुन जाधव आर्केड समोरील भुयारी मार्गातून दोन चाकी, चार चाकी वाहने ये-जा करीत  असतात. या भूयारी (मोरी) मार्गातून सातारा बाजूस जाणाऱ्या वाहनांना  कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहने पूर्णपणे दिसून येत नाहीत व भुयारी

मार्गातून वाहनांचा अर्धा भाग महामार्गावर आल्याशिवाय हायवेवरील वाहने दिसून येत नाहीत, यामुळे या भुयारी मार्ग समोर अनेक अपघात झाले आहेत.

त्यामूळे या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आले आहे, तशी नोंदही 682क्रमांकावर घेण्यात आलेली आहे. या भूयारी (मोरी) मार्गासमोर होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी व ब्लॅक स्पॉट निर्मूलन करण्यासाठी त्या ठिकाणी वाहतुकीच्या बाबतीत उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. पार्श्वभूमीवर आज महामार्गावरील या भुयारी मार्गाची तहसीलदार,

नगरपालिकेचे मुख्याधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम

विभागाचे उपअभियंता, शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर हा भुयारी मार्ग दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी प्रायोगिक तत्त्वावर बंद

करण्याचं निर्णय घेण्यात आला आहे.म्यान भुयारी मार्गाची पाहणी करून संबंधित अधिकारी या ठिकाणावरून गेल्या नंतर काही वेळातच महामार्गावरून सातारा बाजूकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने भुयारातून बाहेर पडलेल्या चार चाकी

गाडीला पाठीमागून धडक दिल्याने गाडीचे नुकसान झाले, तर गत आठवड्यात याच ठिकाणी भुयारी मार्ग ओलांडताना एका महिलेला वाहनाने धडक दिल्याने संबंधित हिला गंभीर जखमी झाली होती.





Comments

  1. Kolhapur pune NH. वर् Karad javal Brize हवा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .