Posts

Showing posts from November, 2021

मा. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ.

Image
  मा. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ. शिराळा : प्रतिनिधि.( नानासाहेब कांबळे.)  तालुक्याच्या पश्चिम भागातील कुसळेवाडी, हाप्पेवाडी, गवळेवाडी (ता. शिराळा) या गावात मा. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला.  25/15 योजनेतून मंजूर केलेल्या या कामांचा शुभारंभ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केला. यावेळी विश्वास कारखाना संचालक शिवाजी पाटील, युवक राष्ट्रवादीचे सुहास घोडे, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ संचालक सुरेश चिंचोलकर व पैलवान शिवाजी लाड, गवळेवाडीचे सरपंच बाबा गोळे, येळापूरचे उपसरपंच दिनकर दिंडे, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, सोसायटीचे अध्यक्ष ताना जी कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

वडगाव हवेली येथे संविधान दिन उत्साहात संपन्न .

Image
  वडगाव हवेली येथे संविधान दिन उत्साहात संपन्न . कार्वे प्रतिनिधी - प्रवीण पाटील.   लोकशाही मूल्यांची जोपासना होणेसाठी व्यापक समाजहीत लक्षात घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती झाली असुन आजच्या काळात संविधान दिन साजरा करून त्याचे महत्व ठिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे मत कराड पंचायत समिती  चे सभापती प्रणव ताटे यांनी व्यक्त केले.  वडगाव हवेली ता. कराड  येथे भारतीय संविधान दिनाचे औचित साधून   येथील बौध्द विकास मंडळ व सम्राट अशोक सामाजिक संस्था मुबंई यांचे संयुक्त विद्यमाने  आयोजित  छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे  प्रतिमा अनावरण  कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच सुनीता जगताप, उपसरपंच राजेंद्र थोरात, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कांबळे, जयवंत जगताप,डॉ. सुधीर जगताप,वसंतराव माठे गोखले, संजय गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभापती ताटे पुढे म्हणाले की,व्यक्तीचा सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास करून न्याय स्वातंत्र समता आणि बंधुता या लोकशाही मूल्यांची जोपासना घटनेच्या(संविधानाच्या ) रूपाने झाली असून घटनेम...

गोंडवाना न्यूज.

Image
                        महत्वाच्या बातम्या. दिनांक :- ३० नोव्हेंबर २०२१. वार      :- मंगळवार. ▪️ जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय; हिवाळी अधिवेशनात विधेयक ▪️ शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या सारस संवर्धनासाठी तरुणांची धडपड; गोंदिया जिल्ह्यातील सेवा संस्थेकडून ७८ गावांत जनजागृती ▪️ समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार; नागपूर ते गोंदियादरम्यान १५० किमी महामार्ग; व्यवहार्यता अभ्यासणार ▪️ परभणीत परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य; जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हा सरहद्दीवर ८ तर परभणी शहरासाठी ६ तपासणी कक्षांची व्यवस्था ▪️नाशिकमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर; मनपा आयुक्त विलास जाधव यांनी दिली माहिती; अफ्रिकेतून परतलेल्या दोन खेळाडूंची तपासणी सुरू ▪️ राज्य सरकारने इशारा देऊनही एसटी संप सुरूच; दिवसभरात १०८८ कर्मचाऱ्यांचं निलंबन, राज्य सरकारचा मोठा निर्णय ▪️पदभरतीस मुदतवाढ मागणाऱ्या सरकारला न्यायालयाने फटकारले; राज्य मानवाधिकार आ...

गोंडवाना न्यूज ब्रेकिंग

Image
                     ठळक घडामोडी. ▪️ हिवाळी अधिवेशनात लोकसभेनंतर आता राज्यसभेत देखील तीन कृषी कायदे विधेयक रद्द करण्याचे विधेयक  मंजूर ▪️ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत विरोधक आक्रमक; 12 खासदारांवर निलंबनाची ही कारवाई ▪️ राज्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय  ▪️ परमवीर सिंह यांना चांदीवाल आयोगाकडून आर्थिक दंड; मुख्यमंत्री निधीत जमा करावी लागणार रक्कम ▪️ हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथे शेतीच्या वादावरून झालेल्या दुहेरी खून प्रकरणामध्ये नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ▪️ दिलासादायक! दक्षिण अफ्रिकेवरून आलेल्या डोंबविलीकराच्या कुटुंबातील 7 जणांचा कोरोना रिपोर्ट  निगेटिव्ह ▪️ राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईत, 12 विधेयकं, मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार   ▪️ बिटकॉईनला देशात चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.. लोकसभेतील प्रश्नोत्...

ऐतवडे बुद्रुक येथे आपले सरकार आपले सेवा केंद्राचे उदघाटन.

Image
  ऐतवडे बुद्रुक येथे आपले सरकार आपले सेवा केंद्राचे उदघाटन. कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न : विविध मान्यवरांच्या उपस्थिती. इस्लामपूर  प्रतिनिधि - सुनिल कांबळे. ऐतवडे बुद्रुक ( ता. वाळवा ) येथे आपले सरकार आपके सेवा केंद्र कार्यालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जधाव यांच्या हस्ते फिट कापून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचेसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी कार्यालयाचे महेश कांबळे, एम. एम. आर. डी. ए. चे जनसंपर्क अधिकारी सुधीर कांबळे, पोलीस पाटील संतोषदेव इंग्रळकर, उपसरपंच अशोक दिंडे, माजी सरपंच सलीम जमादार, दादासो कांबळे, अकबर मुल्ला, संजय कंबळे, शिवाजी फसाले, संदीप कदम, प्रभाकर कांबळे, संतोष कांबळे,किरण कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

अनिल देसाई यांचा नागरी सत्कार.

Image
  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अनिल देसाई यांचा नागरी सत्कार. माझ्या परिवारातील सत्कार आनंददायी ____ देसाई कराड प्रतिनिधी - प्रवीण पाटील.  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी आपल्या परिवातील एक सदस्य काम करतोय या भावनेतून पत्रकार बांधवांनी माझा सत्कार केला. खरतर जगात कोठेही सत्कार होतो मात्र आपल्या परिवारात जो सत्कार होतो तो आंनददायी असतो, असे प्रतिपादन दैनिक मुक्तागिरीचे संपादक व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँंकेच्या संचालकपदी बिनविरोध सलग चौथ्यांदा निवड झालेबद्दल  दैनिक मुक्तागिरीचे संपादक अनिल देसाई यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सत्कार घेण्यात आला. यावेळी  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले, तालुकाध्यक्ष नितिन ढापरे, शहराध्यक्ष संदीप चेणगे, कार्याध्यक्ष अशोक मोहने,  ज्येष्ठ पत्रकार विजय पाटील, हेमंत पवार, खंडू इंगळे, आनंदा थोरात, सुहास बाबर, उमे...

यशवंतराव चव्हाण हे नाव नसून एक विचार.

Image
  यशवंतराव चव्हाण हे नाव नसून एक विचार - प्रा. सुरेश यादव. कराड : प्रतिनिधि.(प्रवीण पाटील.)  यशवंतराव चव्हाण हे नाव नसून तो एक विचार आहे आणि तो राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणात आणला पाहिजे.चव्हाण साहेब हे सर्वांसाठी स्फूर्तीस्थान आहेत आणि या क्षेत्रात पुढे वाटचाल करताना साहेबांचे स्मरण केल्याशिवाय ते अशक्य आहे असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. सुरेश यादव यांनी व्यक्त केले. स्वर्गीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची पुण्यतिथी महाराष्ट्र हायस्कूल, कराड येथे 25 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी करण्यात आली. प्रा. यादव पुढे म्हणाले,आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब हे आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार असून त्यांच्याकडे विकासाचा दूरदृष्टीपणा हा गुण होता म्हणूनच महाराष्ट्र राज्य आज देशात प्रगतीपथावर आहे. चव्हाण साहेबांना कोणत्याही महापुरुषांची तुलना मान्य नव्हती.महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यासाठी आणि झाल्यानंतरही खऱ्या अर्थाने पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा महाराष्ट्र झाला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता.यावेळी प्रा. यादव यांनी चव्हाण साहेबा...

शिराळा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा.

Image
शिराळा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा. शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)  शिराळा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा झाला. महात्मा गांधीच्या प्रतिमेचे अध्यक्ष ॲड. रवि पाटील यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून संघटक व ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.तुकाराम चव्हाण यांनी संविधान पुस्तिकेचे वाचन केले. उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली.यावेळी उपाध्यक्ष श्री. पोपट कदम,श्री.विकास साळुंखे,सरचिटणीस श्री.सुनील घोलप,युवक विधानसभा अध्यक्ष श्री. रविंद्र कोकाटे, ओ बी सी सेल अध्यक्ष श्री. राजेंद्र माने.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

गृहनिर्माण अभियंता मानधनापासून वंचित , 1 डिसेंबर पासून संपाचा इशारा.

Image
गृहनिर्माण अभियंता मानधनापासून वंचित , 1 डिसेंबर पासून संपाचा इशारा. कराड - प्रतिनिधि. ( प्रकाश शिंदे.) "सर्वांसाठी घरे 2022"  ही घोषणा शासनाने केली आहे, परंतु याच घरकुल योजनेचा महत्वाचा कणा असलेले ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मागील 7 महिन्या पासून मानधना पासून वंचित आहेत. अभियंता यांची दिवाळी सण सुध्दा वेतना विना अंधारात गेली आहे. प्रती घरकुल 750 इतक्या तुटपुंज्या मानधनावर हे अभियंते 2016 पासून कार्यरत आहेत.  त्यात वाढ व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला, परंतु त्यांच्या मानधनात जाचक अटी टाकून फक्त 200 रुपये वाढ करून अभियंता यांची कुचेष्टा केली. या उलट अभियंता सोडून बाकी सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस वेतन वाढ दिली. शासनाने या वर्षी 20 नोव्हेंबर 2021 पासून मोठया थाटात" महा आवास " अभियान चालू केलं आहे. बाकी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या प्रति महा वेतना प्रमाणे वेतन दिले नाही तर या महा आवास अभियानात राज्यभरातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी 1 डिसेंबर पासून बंद चा पवित्रा घेतला आहे. त्या मुळे 2022 पर्यंत "सर्वांसाठी घर" ही घोषणा फसवी ठरते की क...

मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली जेष्ठ मार्गदर्शक श्री जयसिंगराव पाटील-उंडाळकर (बापू) यांची सदिच्छा भेट.

Image
   मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी  घेतली जेष्ठ मार्गदर्शक श्री जयसिंगराव पाटील-उंडाळकर (बापू) यांची सदिच्छा भेट. उंडाळे - प्रतिनिधि.(पी.डी.पाटील.) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये, कराड सोसायटी मतदार संघातून राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवल्याबद्दल त्यांनी जेष्ठ मार्गदर्शक श्री जयसिंगराव पाटील-उंडाळकर (बापू) यांच्या उंडाळे ता.कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी ॲड. राजाभाऊ पाटील - उंडाळकर, राजेश पाटील - वाठारकर, पै.संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, अनुज पाटील, प्रशांत यादव, सरपंच सौ.संगीता माळी, गणेश पाटील, बी.आर.पाटील, माजी सरपंच दादासाहेब पाटील, अरविंद शेवाळे, नरेश शेवाळे, प्रवीण पाटील व पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

कुरळप दूध डेअरीच्या उत्पादक सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम संपन्न .

Image
  कुरळप दूध डेअरीच्या उत्पादक सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम संपन्न . वाळवा - प्रतिनिधि. (सुनिल कांबळे.) श्री. वारणा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ ,तात्यासाहेब कोरेनगर  व  श्री. शंकर सहकारी दूध व्यवसाय व उत्पादक संस्था मर्या,  कुरळप दूध डेअरीच्या उत्पादक सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम मा. पै. अशोक पाटील तात्या  यांच्या शुभहस्ते करण्यात आला . या प्रसंगी शंकर दूध संस्था चेअरमन मा. महेंद्र माळी, व्हा चेअरमन दत्तात्रय कुलकर्णी सर,चेअरमन श्री लालासो पाटील (मामा ) पन्हाळा तालुका शिक्षक बँक ,मा. उत्तम वायदंडे (दादा ) याच्या उपस्थितीत संपन्न झाला .  म्हैस दूध उत्पादक शेतकरी प्रथम क्रमांक  1)मोहन गणपती माने-₹20376. 2) नामदेव पांडुरंग देवकर ₹17615. 3) बाबासो रामा भालकर -₹ 17088 4)आत्माराम पांडुरंग देवकर - ₹ 15176  5) रवींद्र रामराव जाधव  - ₹ 14403  गाय दूध उत्पादक शेतकरी   1) मोहन गणपती माने -₹28857. 2)राजराम काशिनाथ तवटे-₹18725.  3) नागेश काशिनाथ शेटे-₹16722 4)अधिक धोंडीराम पाटील -₹16419 5) सुरेश पांडुरंग गुरव-₹15986  य...

इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन.

Image
    इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर   वंचित बहुजन आघाडीचे  आंदोलन. शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.) वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण आणि महंमद पैगंबर बिल राज्य शासनाने मंजूर करावे या मागणीसाठी राज्यभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा प्रदेश सदस्य डॉ. क्रांती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर ही धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. दिलीप सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुमेध माने उपाध्यक्ष रोहन धुमाळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू कांबळे, महासचिव अमित वेटम , संघटक अमर माने, सदस्य दिनकर बोकणे जयदीप कांबळे अभिजीत रासाठी आणि कार्यकर्ते मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कामाचा शुभारंभ.

Image
  आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कामांचा शुभारंभ. शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.) निगडी (शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व जिल्हा परिषद शाळेच्या नवीन उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुक्याच्या सभापती मानिषाताई गुरव, उपसभापती बी के नायकवडी, गट विकास अधिकारी संतोष राऊत, गट शिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर, उप अभियंता सुभाष देवकर, सरपंच सुवर्णा भालेकर, उपसरपंच अमोल घोलप, गणपती भालेकर,  माजी सरपंच वसंत भालेकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश साळुंखे, रवींद्र, दत्तात्रय व मालन गलुगडे, वसंत व विलास साळुंखे, आनंदा व सर्जेराव यादव, संजय जाधव, शाखा अभियता पी. के सुर्वे, एम ए थोरात, अतुल पाटील, विस्तार अधिकारी मटकरे साहेब, ठेकेदार ऋतुराज जाधव, निलेश पाटील, केंद्र प्रमुख रोकडे आदी उपस्थित होते.

विकास पर्व अर्बन निधी बँकेने केला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा केला सन्मान.

Image
  विकास पर्व अर्बन निधी बँकेने केला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा केला सन्मान. कराड - प्रतिनिधि. कराड येथील विकास पर्व अर्बन निधी बँकेच्या वतीने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून शासकीय विश्रामगृहात समारंभ संपन्न झाला या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर वाघमारे संचालक अमोल कणसे यांनी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका जिल्हा संघटक संजय पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अमोल साठे कराड दक्षिण संघटक बाळकृष्ण कुंभार कराड शहर संघटक प्रकाश केसरकर कराड तालुका कार्याध्यक्ष दिगंबर सुतार कराड दक्षिण वृत्तपत्र संघटक प्रताप भणगे सामाजिक मंच सदस्य विवेक वसव यांचा सन्मान करण्यात आला या वेळी बोलताना शेवाळे म्हणाले की विकास पर्व अर्बन निधी बँकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने दिवाळी च्या निमित्ताने ऊस तोडणी कामगारांच्या खोपी मध्ये जाऊन त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले हा उपक्रम आदर्श...

धोकादायक चौकात बसवले कॉनव्हॅक्स मिरर अपघात टाळण्यासाठी सुहास जगताप यांची संकल्पना.

Image
  धोकादायक चौकात बसवले कॉनव्हॅक्स मिरर  अपघात टाळण्यासाठी सुहास जगताप यांची संकल्पना. कराड : प्रतिनिधी कराड येथील नगरसेवक सुहास जगताप यांच्या कल्पनेतून सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स  मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले. याचे उद्घाटन पोलिस उपअधिक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. अंजली कुंभार यांची उपस्थिती होती. पेठेतील 15 धोकादायक चौकामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी हे आरसे बसवण्यात आले. यावेळी रणजित पाटील म्हणाले, सोमवार पेठेतील चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूकीची गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी कॉनव्हॅक्स   मिररची आवश्यकता होती. सुहास जगताप यांनी ही गरज ओळखून समाजउपयोगी केलेले हे काम कौतुकास्पद आहे.  दुष्यंत देशपांडे प्रास्ताविक करताना म्हणाले,  सुहास जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून नागरिकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे विकासकामे केली आहेत. सोमवार पेठेमध्ये नागरिकांची सातत्याने ये  असते तसेच प्रितीसंगम घाटाकडून जाणारे वाहने सोमवार पेठेतून वळवण्यात आली आहेत. त्यामुळे या वाहनांचा मो...

अन्न व औषध प्रशासनाचे कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात हाँटेल, ढाबा यांच्याकडे कानाडोळा.

Image
  अन्न व औषध प्रशासनाचे कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात हाँटेल, ढाबा यांच्याकडे कानाडोळा.     गोंडवाना न्युज -  पि.डी.पाटिल   सातारा जिल्हातील कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे भेसळखोरीचे  दिवसेदिवस प्रमाण वाढत चालले आहे. मात्र यावर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय वेळ मिळत नसल्याने या  भागात सर्रासपणे भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सातारा अन्न औषध प्रशासनाने कार्यलय कराड दक्षिणच्या ग्रामीण भभागातील हाँटेल, ढाबे, वडा पाव खाणावळी, चायनिज, छोट्या रेस्टॉरंट ची वेळीच पाहणी करुन , आपल्या अर्थिक फाद्यासाठी ग्राहकांच्या जिवाशी खेळ करण्यावर योगयोग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.   गत दोन वर्षा पासुन कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात छोट्या हाँटेल,ढाबे , चायनिज सेंटर, वडा पाव व्यवसात भरमसाठ वाढ झाली असून  भागात मागील काही वर्षांत भेसळयुक्त पदार्थ व दूषित पाणी असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये  भेसळयुक्त पदार्थांच...

डॉ.संदीप कांबळे यांना २०२१ चा " नागराज कला रत्न पुरस्कार " प्राप्त.

Image
डॉ.संदीप कांबळे यांना २०२१ चा  " नागराज कला रत्न पुरस्कार " प्राप्त. शिराळा - प्रतिनिधि. शिराळा सांस्कृतिक कला मंच व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने ,विश्र्वास उद्योग समूह यांच्या सौजन्याने लायन्स क्लब भाटशिरगाव येथे स्वर संदिप कला मंच चे निर्माता दिग्दर्शक डॉ संदीप कांबळे यांचा कलाकार म्हणून सत्कार करुन सन्मानपत्र देताना सिने अभिनेता लेखक / दिग्दर्शक , हास्यसम्राट प्रकाश भागवत , रंगराव घागरे, वैजनाथ चौगुले ,विक्रम दाभाडे व इतर मान्यवर...! तसेच राज डान्स अकॅडमी शिराळा यांच्या वतीने राज लोखंडे व शिराळा शहर नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते डॉ.संदीप कांबळे यांना २०२१ चा  " नागराज कला रत्न पुरस्कार " प्रदान करण्यात आला.

नवीन वसाहत सोनवडे येथे लोकसहभागातून रस्त्याची साफसफाई.

Image
  नवीन वसाहत सोनवडे येथे लोकसहभागातून रस्त्याची साफसफाई.        शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)  सोनवडे येथील नवीन वसाहतीतील रस्त्याची साफसफाई रस्त्या लगत वाढणारे झाडेझुडपे रस्त्याची दुरावस्था झालेने नवीन वसाहतील नागरिकांनी एकत्र येऊन संपूर्ण रस्त्याची साफसफाई केली. यावेळी माननीय पांडुरंग बाबर, बुधाजी कांबळे, धोंडीराम कांबळे, शंकर कांबळे, दीपक कांबळे, संदीप कांबळे, अमोल कांबळे, संकेत यादव, साहिल पवार सर्वांनी मिळून श्रमदान केले.

बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन.

Image
  बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन. कराड - प्रतिनिधि.  बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन कराड तहसील कचेरी समोर चालू आहे.   उस हंगाम सुरू होऊन साधारण पंधरा ते वीस झाले परंतू अद्यापही सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अपवाद वगळता तर एकाही साखर कारखान्याने एक रकमी एफ आर पी जाहीर केली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी देण्याचे मान्य केले कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी एक आर पी दिली इतर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे चेअरमन मुग गिळून गप्प बसलेत ज्यावेळी साखरेचा दर बावीस रुपये होता त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा उसाला दर चोवीसशे ते पंचवीसशे रुपये दर मिळाला आहे या साखर कारखानदारांना आंदोलनाचीच भाषा कळते पाच वर्षे साखरेला दर कमी होता त्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं  नाही परंतू आता साखरेचे टेंडर छत्तीस रुपये ते सदतीस रुपये झाले आहे तरी कारखानदार शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याच्या मानसिकतेत नाही साधारण आत्ता शेतकऱ्यांना ३६०० रुपये दर द्यायला काहीच अडचण नाही  सर्व शेतकरी बांधवांना ...

डांगे परिवाराकडुन उंडाळे येथील कुटुंबाना दिवाळी साहित्य वाटप.

Image
    डांगे परिवाराकडुन  उंडाळे येथील कुटुंबाना दिवाळी साहित्य वाटप.     उंडाळे -  पि.डी.पाटिल.( गोंडवाना न्युज,)     सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी उंडाळे येथील  दानशूर व्यक्तिमत्व असणारे सुभाषराव डांगे व डांगे परिवाराकडुन उंडाळे येथील गोसावी वस्तीतील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे.  वस्त्यांवर- पालात आणि रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने सुभाषराव डांगे व डांगे परिवारा तर्फे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.यावेळी उंडाळे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष धनाजी पाटिल, बबलु डांगे, अमर पाटिल, सागर पाटिल उपस्थित होते.

सुधिर रामचंद्र पाटील यांची धाडसी कामगिरी.

Image
सुधिर रामचंद्र पाटील  यांची धाडसी कामगिरी. 'समाजातून होतेय या कामगिरीबद्दल  कौतुक.' उंडाळे :- येळगाव ता .कराड  येथील पितापुत्राना धरणात उडीमारून वाचवल्या बद्दल देशीबन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मा. सुधीर पाटील दादांचा येळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करताना येळगावचे सरपंच मन्सूर इनामदार (शेठ), पत्रकार विजय पवार, आबा शेवाळे, नितीन साळुंखे, सुरज पाटील, संदीप पाटील, बाबुराव शेटे व इतर. उंडाळे - प्रतिनिधि.(पी.डी.पाटिल.)  उंडाळे ता. कराड,  दुचाकीवरून जात असताना चक्कर येऊन धरणात पडलेल्या पिता पुत्राला धरणात उडी घेऊन पाण्याबाहेर काढत त्यांचा जीव वाचवल्याची घटना येथे आज घडली.सुनील महादेव पाटील व चि अथर्व  सुनिल पाटील रा येळगाव असे या घटनेत बचावलेल्या पितापुत्रांचे नाव असून त्यांना वाचवणार्या युवकाचे नाव सुधिर रामचंद्र पाटील रा उंडाळे  असे आहे. या धाडसी कामगिरीबद्दल सुधीर यांचे परिसरातून कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, आज सायंकाळी साडेतीनच्या सुमारास येळगाव येथील सुनील पाटील हे आपला मुलगा  अथर्व ला घेऊन दुचाकीवरून   उंडाळ्याक...

आरळा ता - शिराळा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.

Image
  आरळा  ता - शिराळा येथे  विकास कामांचे भूमिपूजन.  _______ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न. शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.) आरळा (ता.शिराळा) येथे २५/१५ योजनेतून दहा लाख रुपये खर्चाच्या स्वागत कमान ते निनाई मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, उपसरपंच सदाजी पाटील, माजी सरपंच निलोफर डांगे, सदस्य रामभाऊ बडदे, अनिता चौगुले, तानाजी भाष्टे, तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष युवराज पाटील, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, काळुंद्र सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश उबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासो बेरडे, महेश बेरडे, शामराव निर्मळ, रामचंद्र उचगावकर, शिवाजी येसले, बाबुराव कळंत्रे, संजय भाष्टे, विश्वास भुसारी, प्रकाश खोत, भगवान नांगरे, अर्चना कांदेकर, सविता भाष्टे, हसिना मुल्ला, राजेश भाष्टे, संजय शिरंबेकर, सचिन पाटील, सिताराम यादव, कोंडाबा चौगुले, सुजय देशपांडे, सुजय चौगुले, संजय पाटील, सतीष पाटील आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम आदर्शवत.

Image
  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम आदर्शवत. _______________सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते.      कराड   - प्रतिनिधि . (ज्ञानेश्वर शेवाळे.)  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी शिवशंभो वृद्धाश्रम सेवा मंडळ नेर्ले ता वाळवा जि सांगली येथे दिवाळी च्या निमित्ताने येथे फराळाचे वाटप करण्यात आले या वेळी कासेगाव येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या हस्ते दिवाळी फराळ चे वाटप करण्यात आले या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले, जिल्हा संघटक संजय पाटील, कार्याध्यक्ष कराड तालुका तानाजी चव्हाण, वृत्तपत्र संघटक कराड दक्षिण प्रताप भणगे, संस्थेचे संचालक लक्ष्मण पाटील उपस्थित होते. या वेळी बोलताना मते म्हणाले माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण समाजाला काही तरी देनं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या मार्गदर्शन...

स्व. जयमाला भोसले यांना मान्यवरांची आदरांजली.

Image
  स्व. जयमाला भोसले यांना मान्यवरांची आदरांजली. कराड, ता. ३ : सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले (वय ८९) यांचे सोमवारी (ता. १) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. के.सी.टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात आज त्यांचा रक्षाविसर्जन विधी संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आईसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.  स्व. जयमाला भोसले यांच्यावर मंगळवारी (ता. २) के.सी.टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याचठिकाणी आज डॉ. सुरेश भोसले, श्री. पृथ्वीराज भोसले, डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, डॉ. जयवर्धन भोसले यांच्या हस्ते रक्षाविसर्जनासह धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, इंद्रजीत मोहिते, राजेंद्रसिंह घाटगे, सिद्धार्थ घाटगे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते. यानिमित्ताने झालेल्या आदरांजली सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ...

कृष्णा’च्या आईसाहेब हरपल्या!

Image
‘ कृष्णा’च्या आईसाहेब हरपल्या! श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन; कृष्णाकाठच्या परिसरात शोककळा. कराड, ता. २ : सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले (वय ८९) यांचे सोमवारी (ता. १) रात्री ११.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कृष्णा परिवाराच्या ‘आईसाहेब’ हरपल्या असून, कृष्णाकाठच्या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. २) दुपारी १२.३० च्या सुमारास के.सी.टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  कोल्हापूरातील कर्नल नानासाहेब दत्ताजीराव इंगळे यांच्या कन्या असलेल्या जयमाला यांचा जन्म १३ डिसेंबर १९३२ रोजी झाला. हायर सेकंडरीपर्यंत शिक्षण घेतल्यावर १९ मे १९५२ रोजी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर जयमाला भोसले (आईसाहेब) यांनी आप्पासाहेबांच्या प्रत्येक कार्याला पाठबळ देत, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलली. या भागात समृद्धी नां...

कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन.

Image
  कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन. कराड - प्रतिनिधि. कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे सोमवार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11.30 या वेळेत कृष्णा हॉस्पिटलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, दुपारी ठीक 12 वाजता कोयना वसाहतीतील केसीटी कृष्णा स्कुलच्या पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.