वडगाव हवेली येथे संविधान दिन उत्साहात संपन्न .
वडगाव हवेली येथे संविधान दिन उत्साहात संपन्न .
कार्वे प्रतिनिधी - प्रवीण पाटील.
लोकशाही मूल्यांची जोपासना होणेसाठी व्यापक समाजहीत लक्षात घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती झाली असुन आजच्या काळात संविधान दिन साजरा करून त्याचे महत्व ठिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे मत कराड पंचायत समिती चे सभापती प्रणव ताटे यांनी व्यक्त केले.
वडगाव हवेली ता. कराड येथे भारतीय संविधान दिनाचे औचित साधून येथील बौध्द विकास मंडळ व सम्राट अशोक सामाजिक संस्था मुबंई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमा अनावरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच सुनीता जगताप, उपसरपंच राजेंद्र थोरात, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कांबळे, जयवंत जगताप,डॉ. सुधीर जगताप,वसंतराव माठे गोखले, संजय गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सभापती ताटे पुढे म्हणाले की,व्यक्तीचा सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास करून न्याय स्वातंत्र समता आणि बंधुता या लोकशाही मूल्यांची जोपासना घटनेच्या(संविधानाच्या ) रूपाने झाली असून घटनेमुळे सर्व सामान्य लोकांना दिशा मिळत आहे.
या ताकतीमुळे माझ्यासारखा सामान्य व्यक्ती सभापती पदापर्यंत पोहचला.
यावेळी डॉ. सुधीर जगताप, श्रीरंग साळुंखे, पत्रकार रामभाऊ जगताप, अधिक जगताप, महेश लोखंडे, जे. जे. जगताप आधीनी भारतीय संविधान त्याचे फायदे व महत्व तसे च छत्रपती शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आदी विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावच्या सर्वांगीण विकासात योगदान दिलेल्या आजी माजी सरपंच-उपसरपं, सामाजिक संस्थेचे आजी माजी अध्यक्ष पदाधिकारी तसेच गावात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी,सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी,शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, आशा वर्कर, बचत गट व कोरोना योद्धाचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सेवानिवृत्त कृषी अधिकारी संजय गोखले यांनी तर आभार गणपत गोखले यांनी मानले. कार्क्रमास वैदकीय अधिकारी डॉ. एस. एस. घोलप, डॉ. ए. व्ही.कांबळे, विज वितरणचे कनिष्ठ अभियंता राजमाने, माजी सरपंच दिलीप चव्हाण, विमल जगताप, सत्यवान जगताप, पांडुरंग जगताप, राजन संदे, शंकर ठावरे, उत्तम जगताप, संतोष जगताप, जयवंत जगताप, धनंजय जगताप,ग्रामविकास अधिकारी प्रभाकर केंगार, तलाठी आर. एम. जाधव, पोलीस पाटील दिपक जगताप,अशोक जगताप,विद्या गोखले, बाजीराव गोखले, विलास गोतपगार जितेंद्र गोखले आदीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment