इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन.

    इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर   वंचित बहुजन आघाडीचे  आंदोलन.

शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण आणि महंमद पैगंबर बिल राज्य शासनाने मंजूर करावे या मागणीसाठी राज्यभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा प्रदेश सदस्य डॉ. क्रांती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर ही धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. दिलीप सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुमेध माने उपाध्यक्ष रोहन धुमाळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू कांबळे, महासचिव अमित वेटम , संघटक अमर माने, सदस्य दिनकर बोकणे जयदीप कांबळे अभिजीत रासाठी आणि कार्यकर्ते मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .