अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम आदर्शवत.

 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम आदर्शवत.

_______________सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते.

    कराड  - प्रतिनिधि . (ज्ञानेश्वर शेवाळे.)

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी शिवशंभो वृद्धाश्रम सेवा मंडळ नेर्ले ता वाळवा जि सांगली येथे दिवाळी च्या निमित्ताने येथे फराळाचे वाटप करण्यात आले या वेळी कासेगाव येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या हस्ते दिवाळी फराळ चे वाटप करण्यात आले या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले, जिल्हा संघटक संजय पाटील, कार्याध्यक्ष कराड तालुका तानाजी चव्हाण, वृत्तपत्र संघटक कराड दक्षिण प्रताप भणगे, संस्थेचे संचालक लक्ष्मण पाटील उपस्थित होते. या वेळी बोलताना मते म्हणाले माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण समाजाला काही तरी देनं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे याचा आदर्श इतरांनाही घेण्या सारखा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. तर आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार कधी ही विसरू नये आणि त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आपल्या आधाराची गरज असते अश्या वेळी त्यांची साथ सोडू नये. खरतर वृद्धाश्रम ही संकल्पनाच नसावी अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .