डांगे परिवाराकडुन उंडाळे येथील कुटुंबाना दिवाळी साहित्य वाटप.
डांगे परिवाराकडुन उंडाळे येथील कुटुंबाना दिवाळी साहित्य वाटप.
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी उंडाळे येथील दानशूर व्यक्तिमत्व असणारे सुभाषराव डांगे व डांगे परिवाराकडुन उंडाळे येथील गोसावी वस्तीतील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे.
वस्त्यांवर- पालात आणि रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने सुभाषराव डांगे व डांगे परिवारा तर्फे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.यावेळी उंडाळे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष धनाजी पाटिल, बबलु डांगे, अमर पाटिल, सागर पाटिल उपस्थित होते.
Comments
Post a Comment