मा. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ.

  मा. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ.

शिराळा : प्रतिनिधि.( नानासाहेब कांबळे.)

 तालुक्याच्या पश्चिम भागातील कुसळेवाडी, हाप्पेवाडी, गवळेवाडी (ता. शिराळा) या गावात मा. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला.  25/15 योजनेतून मंजूर केलेल्या या कामांचा शुभारंभ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केला. यावेळी विश्वास कारखाना संचालक शिवाजी पाटील, युवक राष्ट्रवादीचे सुहास घोडे, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ संचालक सुरेश चिंचोलकर व पैलवान शिवाजी लाड, गवळेवाडीचे सरपंच बाबा गोळे, येळापूरचे उपसरपंच दिनकर दिंडे, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, सोसायटीचे अध्यक्ष तानाजी कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .