गोंडवाना न्यूज ब्रेकिंग
ठळक घडामोडी.
▪️ हिवाळी अधिवेशनात लोकसभेनंतर आता राज्यसभेत देखील तीन कृषी कायदे विधेयक रद्द करण्याचे विधेयक मंजूर
▪️ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत विरोधक आक्रमक; 12 खासदारांवर निलंबनाची ही कारवाई
▪️ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय
▪️ परमवीर सिंह यांना चांदीवाल आयोगाकडून आर्थिक दंड; मुख्यमंत्री निधीत जमा करावी लागणार रक्कम
▪️ हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथे शेतीच्या वादावरून झालेल्या दुहेरी खून प्रकरणामध्ये नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
▪️ दिलासादायक! दक्षिण अफ्रिकेवरून आलेल्या डोंबविलीकराच्या कुटुंबातील 7 जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
▪️ राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईत, 12 विधेयकं, मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार
▪️ बिटकॉईनला देशात चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात अर्थ मंत्रालयाचं लेखी उत्तर
▪️ ओमिक्रॉननं धाकधूक वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारीत गाईडलाईन्स जारी
▪️ ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक; दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचा दावा
▪️ “सरकार घाबरले आहे, चुकीचे काम केल्याचे त्यांना माहीत आहे”; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया
▪️ भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला कसोटी सामना अखेर अनिर्णित अवस्थेत सुटला
Comments
Post a Comment