अन्न व औषध प्रशासनाचे कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात हाँटेल, ढाबा यांच्याकडे कानाडोळा.
अन्न व औषध प्रशासनाचे कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात हाँटेल, ढाबा यांच्याकडे कानाडोळा.
गोंडवाना न्युज - पि.डी.पाटिल
सातारा जिल्हातील कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे भेसळखोरीचे दिवसेदिवस प्रमाण वाढत चालले आहे. मात्र यावर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय वेळ मिळत नसल्याने या भागात सर्रासपणे भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सातारा अन्न औषध प्रशासनाने कार्यलय कराड दक्षिणच्या ग्रामीण भभागातील हाँटेल, ढाबे, वडा पाव खाणावळी, चायनिज, छोट्या रेस्टॉरंट ची वेळीच पाहणी करुन , आपल्या अर्थिक फाद्यासाठी ग्राहकांच्या जिवाशी खेळ करण्यावर योगयोग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गत दोन वर्षा पासुन कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात छोट्या हाँटेल,ढाबे , चायनिज सेंटर, वडा पाव व्यवसात भरमसाठ वाढ झाली असून भागात मागील काही वर्षांत भेसळयुक्त पदार्थ व दूषित पाणी असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये
भेसळयुक्त पदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करणे आवश्यक आहे. पंरतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
ग्रामीण भागात तरुणाई शहरी संस्कृती चे अनुकरण करत असल्यामुळे ग्रामीण भागात फास्टफुड खैवव्याची व विक्री करण्याची संख्या दुपट्टीने वाढ झाल्याचे चित्र दिसत असुन त्यामुळे नाष्टा दुकाने, हाँटेल, ढाबे, चायनिज सेंटर, वडापाव गाड्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. दुसरीकडे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विकले जातात. ते पदार्थ खाण्यायोग्य आहेत की नाही यासाठी त्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी ग्रामीण भागात प्रशासनाची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांची फसवणूक करून मोठ्याप्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
त्याच बरोबर हाकेच्या अंतरावर ढाबे व्यवसायिक आपले बस्थान मांडुन सज्ज असुन , सदरील ढाबे चालकांकडुन कोणत्याही प्रकारच्या परवान्याची घेतली जात नसुन ही बिनधास्तपणे ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. ढाब्यावर कोणतीच स्वच्छता, नियम पाळले जात नसुन बहुतांश ढाब्यावर अवैध दारु विक्री होण्यासह , ढाब्यासह लाँजिंग ची सोय असण्या-या हाँटेलमध्ये अवैध व्यवसाय बिनधकपणे चालवण्यात येत आहे. संबंधित व्यवसायाविरोधात स्थानिक पोलिस प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात लागेबांधे असल्यामुळे त्यांना कायद्याचे भय राहिले नसुन निदान अन्न व औषध प्रशासनाने तरी ग्राहकांची होणारी भेसळ युक्त पदार्थामधुन तरी मुक्तता करावी अशी मागणी सर्वसामान्य, ग्राहकांमधुन होवु लागली आहे.
सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर.
कराड दक्षिणच्या ग्रामीण भागातील मोठमोठ्या हाँटेल, ढाबे, चायनिज सेंटर पासुन नाष्टा, वडापाव च्या गाड्यावर व्यवसायिक सिलिंडर नगण्य दिसुन येतात, मात्र घरगती सिलेंडर चा मोठ्या प्रमाणात साठा आढळुन येतो, परिसरामध्ये वेगवेगळ्या गँस वितरण कंपनीच्या वाहनधारकाचे व संबधित व्यवसायिकाचे अर्थपुर्ण व्यवहार ह्यामधुन आपली प्रचिती देत असुन सर्वसामान्य गँस ग्राहक मात्र गँस च्या प्रतिक्षेत दिवसदिवभर ताटंकळत ऊभारताना दिसुन येतो.
प्रतिष्ठित काँलेज परिसरातील हाँटेल व्यवसाया आडुन अवैध धंदे
ग्रामीण भागातील विद्यार्थासाठी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी या परिसरात मोठ्या कँपस् उभारणी करण्यात आली असुन सदरील काँलेज पासुन हाकेच्या अंतरावर लाँजिंग व खैवव्याच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या टोलेजंग इमारतीमध्ये अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात तग धरू लागल्याने पालक वर्गामधुन नाराजी सुर उठत असुन अन्न व औषध प्रशासनाबरोबर , पोलिस प्रशासनाने संबंधित काँलेज परिसरातील ईमारतीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असुन , संबंधित व्यवसाय कोण्याच्या आशिर्वादाने बिनधकपणे चालवला जातोय याचा शोध घेण्याची मागणी पालक वर्गामधुन जोर धरु लागली आहे.
Comments
Post a Comment