बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन.
बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन.
कराड - प्रतिनिधि.
बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन कराड तहसील कचेरी समोर चालू आहे. उस हंगाम सुरू होऊन साधारण पंधरा ते वीस झाले परंतू अद्यापही सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अपवाद वगळता तर एकाही साखर कारखान्याने एक रकमी एफ आर पी जाहीर केली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी देण्याचे मान्य केले कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी एक आर पी दिली इतर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे चेअरमन मुग गिळून गप्प बसलेत ज्यावेळी साखरेचा दर बावीस रुपये होता त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा उसाला दर चोवीसशे ते पंचवीसशे रुपये दर मिळाला आहे या साखर कारखानदारांना आंदोलनाचीच भाषा कळते पाच वर्षे साखरेला दर कमी होता त्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं नाही परंतू आता साखरेचे टेंडर छत्तीस रुपये ते सदतीस रुपये झाले आहे तरी कारखानदार शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याच्या मानसिकतेत नाही साधारण आत्ता शेतकऱ्यांना ३६०० रुपये दर द्यायला काहीच अडचण नाही सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कि आता उसाला दर वाढवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी. पक्षांच्या भिंती तोडून उस आंदोलनात सहभागी झाले पाहिजे आपली ताकत या मूजोर कारखानदारांना दाखविली पाहिजे अन्यथा आपले मोठे नुकसान होईल एक रकमी एफ आर पी अधिक सहाशे रुपये भाव घेण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कराड तहसील कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे तरी गावा गावातील शेतकऱ्यांनी गणेशोत्सव मंडळ यांनी प्रत्यक्ष येऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केले आहे.
Comments
Post a Comment