शिराळा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा.
शिराळा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा.
शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)
शिराळा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा झाला. महात्मा गांधीच्या प्रतिमेचे अध्यक्ष ॲड. रवि पाटील यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून संघटक व ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.तुकाराम चव्हाण यांनी संविधान पुस्तिकेचे वाचन केले. उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली.यावेळी उपाध्यक्ष श्री. पोपट कदम,श्री.विकास साळुंखे,सरचिटणीस श्री.सुनील घोलप,युवक विधानसभा अध्यक्ष श्री. रविंद्र कोकाटे, ओ बी सी सेल अध्यक्ष श्री. राजेंद्र माने.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment