अनिल देसाई यांचा नागरी सत्कार.

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अनिल देसाई यांचा नागरी सत्कार.

माझ्या परिवारातील सत्कार आनंददायी ____ देसाई

कराड प्रतिनिधी - प्रवीण पाटील.

 सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी आपल्या परिवातील एक सदस्य काम करतोय या भावनेतून पत्रकार बांधवांनी माझा सत्कार केला. खरतर जगात कोठेही सत्कार होतो मात्र आपल्या परिवारात जो सत्कार होतो तो आंनददायी असतो, असे प्रतिपादन दैनिक मुक्तागिरीचे संपादक व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँंकेच्या संचालकपदी बिनविरोध सलग चौथ्यांदा निवड झालेबद्दल  दैनिक मुक्तागिरीचे संपादक अनिल देसाई यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सत्कार घेण्यात आला. यावेळी  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले, तालुकाध्यक्ष नितिन ढापरे, शहराध्यक्ष संदीप चेणगे, कार्याध्यक्ष अशोक मोहने,  ज्येष्ठ पत्रकार विजय पाटील, हेमंत पवार, खंडू इंगळे, आनंदा थोरात, सुहास बाबर, उमेश सुतार, संतोष खालकर,  विशाल पाटील, सुनील परीट यांची उपस्थिती होती.

सातारा जिल्ह्याची मुख्य अर्थवाहिनी, सहकार क्षेत्राची मातृसंस्था असलेल्या व देशात नावलौकिक मिळवलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेच्या संचालक मंडळावर सलग चौथ्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची आपल्या सारख्या अष्टपैलू, प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वास बिनविरोध संधी मिळाली, हा आपल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आहे. अशा नावाजलेल्या संस्थेच्या संचालकपदी सलग चौथ्यांदा बिनविरोध होण्याचा बहुमान दैनिक मुक्तागिरीच्या संपादकांना मिळत आहे. याचा आम्हा सर्व पत्रकारांना मनस्वी आनंद झाला आहे. आपल्या या उत्तुंग भरारीचा आम्हां सर्वांना अभिमान वाटतोय असल्याच्या भावना अनिल देसाई यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्रातून पत्रकारांनी व्यक्त केल्या.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .