सुधिर रामचंद्र पाटील यांची धाडसी कामगिरी.

सुधिर रामचंद्र पाटील  यांची धाडसी कामगिरी.

'समाजातून होतेय या कामगिरीबद्दल  कौतुक.'

उंडाळे :- येळगाव ता .कराड  येथील पितापुत्राना धरणात उडीमारून वाचवल्या बद्दल देशीबन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मा. सुधीर पाटील दादांचा येळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करताना येळगावचे सरपंच मन्सूर इनामदार (शेठ), पत्रकार विजय पवार, आबा शेवाळे, नितीन साळुंखे, सुरज पाटील, संदीप पाटील, बाबुराव शेटे व इतर.

उंडाळे - प्रतिनिधि.(पी.डी.पाटिल.)

 उंडाळे ता. कराड,  दुचाकीवरून जात असताना चक्कर येऊन धरणात पडलेल्या पिता पुत्राला धरणात उडी घेऊन पाण्याबाहेर काढत त्यांचा जीव वाचवल्याची घटना येथे आज घडली.सुनील महादेव पाटील व चि अथर्व  सुनिल पाटील रा येळगाव असे या घटनेत बचावलेल्या पितापुत्रांचे नाव असून त्यांना वाचवणार्या युवकाचे नाव सुधिर रामचंद्र पाटील रा उंडाळे  असे आहे. या धाडसी कामगिरीबद्दल सुधीर यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,

आज सायंकाळी साडेतीनच्या सुमारास येळगाव येथील सुनील पाटील हे आपला मुलगा  अथर्व ला घेऊन दुचाकीवरून   उंडाळ्याकडून येळगावच्या दिशेने निघाले होते .उंडाळे धरणावरील पुलावरून जात असताना सुनील पाटील  यांना चक्कर आली .  वेगात ते गाडीसह धरणात पडले .देशीबन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी त्यांना धरणात पडताना पाहिले .सुधीर पाटील यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत क्षणाचाही  विलंब न करता अंगावरील कापड्यासह पाण्यात उडी टाकून त्या पिता पुत्राला पाण्यातून बाहेर काढले .अनेकांनी मोबाईल काढून त्याचे चित्रीकरण केले .पण सुधीरने  मोबाईल सह पाण्यात उडी मारून माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आणून दिला . दिवाळीच्या दिवशी आपण नवीन कापड्यासह खिशातील मोबाईलचा विचार न करता ,पाण्यात उडी टाकून जी तत्परता व माणुसकीचे दर्शन घडवून पिता पत्राचे प्राण वाचवले. सुधीर चे सर्वत्र अभिनंदन होत आहे .  


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .