कराड तालुक्याचे उदयोन्मुख नेतृत्व मा.विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
कराड तालुक्याचे उदयोन्मुख नेतृत्व मा.विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा. कराड - प्रतिनिधी. सहकार महर्षी जयवंतराव भोसले आप्पांचे नातू व कृष्णा सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसलेंचे सुपूत्र विनायक तथा विनूबाबा यांचा वाढदिवस कराड तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मितभाषी, अभ्यासू व विनम्रता या विशेष सदगुणांमुळे विनूबाबांविषयी सर्वत्र आपुलकी व आदराची भावना पहायला मिळते. महाराष्ट्राच्या सहकार व वैद्यकीय क्षेत्रात कराडच्या कृष्णा उद्योग समूहाचे उल्लेखनीय योगदान व नेत्रदीपक कामगिरी सर्वांना हेवा वाटणारी ठरली आहे. कृष्णा उद्योग समुहाच्या जडणघडणीत आप्पांचा सेवाभावी विचार, सुरेशबाबांचे नीटनेटके नियोजन व विनूबाबांचा सुधारणावादी व तंत्रज्ञान स्नेही दृष्टीकोन यामुळेच कृष्णा उद्योग समूहाने विकासाचा आदर्श मापदंड तयार केला आहे. संस्थेच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रवास सुरु आहे यामध्ये उदयोन्मुख नेतृत्व मा. विनूबाबा यांचीही मोलाची भूमिका आहे. म्हणूच विनूबाबांचा वाढदिवस समाजातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. विनूबाब...