जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाचा एक गाव एक गणपती उपक्रम आदर्शवत .
जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाचा एक गाव एक गणपती उपक्रम आदर्शवत .
ब्यूरो रीपोर्ट - ज्ञानेश्वर शेवाळे.
येवती ता. कराड येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून साधारण ३० वर्षा पासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवनारे मंडळ आहे .या मंडळा मधे लहान बालका पासून ते अगदी वयोवृद्ध सुद्धा या मंडळात सदस्य आहेत .या मंडळाचे तरूण सदस्य दर वर्षी नव नविन सामाजिक उपक्रम राबवत असतात. या वर्षी देखील लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा या साठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत .तर घरगुती गौरी गणपती आरास व सजावट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. महिलां साठी हळदी कुंकू ,महाप्रसाद ,आदी आयोजन करण्यात आले आहे .या वर्षी मंडळाने निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मंदीराची उभारणी करून गणरायाची स्थापना केली .या साठी गावातील तरुणांनी एकत्र येऊन दिवस रात्र एक करून मंदिर उभारणी साठी श्रम घेतले .आणि या साठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मंडळाला लाभले.

Comments
Post a Comment