शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या संस्कारातून तयार झालेले उत्तमराव यादव एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व- कौस्तुभजी गावडे.

 शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या संस्कारातून तयार झालेले उत्तमराव यादव एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व- कौस्तुभजी गावडे.

कोळे -  प्रतिनिधी.

कै. दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूल ,आरेवाडी (उत्तरतांबवे)  ता. कराड विद्यालयाचे आधारस्तंभ कै .यु उत्तमराव यादव  व त्यांचे चिरंजीव कै. दत्तात्रय यादव यांचा संयुक्त स्मृतिदिन कार्यक्रम विद्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती के .बी.पाटील  यांनी केले प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सी .ई .ओ  कौस्तुभजी गावडे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी बापूजींचे विचार व संस्कार व  प्रशासकीय कामकाज यातून तयार झालेले कै.यु.एच.यादव  यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. 25 वर्षे होऊन गेले तरी त्यांचे कार्य आपण आज जवळून पाहत आहोत.त्यांच्या कार्याचे अनुकरण करत आहोत. विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नवादी रहावे स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव आर. के. भोसले  यांनी भारतीय शिक्षण व इंग्लंड मधील शिक्षण यातील फरक विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. विद्यार्थ्यांनी व  शिक्षकांनी काळानुसार बदलले पाहिजे.बदल स्वीकारण्यास तयार असले पाहिजे ,अंगी कौशल्य संपादन केले पाहिजे असे विचार त्यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडले.यावेळी विद्यालयातील एन‌. एम. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झालेल्या सात विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार श्री पाटील सर यांनी मानले.यावेळी सातारा जिल्हा विभाग प्रमुख माननीय श्री कुंभार ए.जे. सर,संस्थेचे आजीव सेवक   माने ए. बी माने विद्यालयाच्या शाळामाता श्रीमती तारुबाई यादव,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील ,स्कूल कमिटीचे चेअरमन हणमंतराव चव्हाण ,उद्योजक सचिन पवार,लक्ष्मण देसाई,आरेवाडीच्या सरपंच सौ.रेश्मा यादव, गमेवाडी सरपंच सौ.सविता ढवळे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .