मलकापुर नगरपरिषदेने पाणी बिल ऑनलाईन करावे.
मलकापुर नगरपरिषदेने पाणी बिल ऑनलाईन करावे
_____हणमंतराव जाधव.
प्रतिनिधी /कराड
मलकापूर नगरपरिषदेने २४x७ पाणी पुरवठा योजनेची ऑनलाईन पध्दतीने स्विकारावीत अशा मागणीचे निवेदन मलकापूर नगरपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते हणमंतराव जाधव यांनी मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्याकडे केली.
यावेळी हणमंतराव जाधव, भा.ज.पा.तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख, मंगेश जाधव, सुर्यकांत खिलारे, अमोल पाटील, अजित सांडगे ,दिलीप जाधव, स्वप्निल पाचपुते यांची उपस्थिती होती.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि मलकापुर नगरपरिषदेची २४x७ योजनेचा गौरव राज्यासह देशपातळीवर झाला आहे.
सदर योजना शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहचली आहे. शहरातील बहुतांश लोक व्यवसाय ,नोकरीनिमित्त परगावी असतात त्यांना वेळे अभावी बिल स्विकृती केंद्रापर्यंत पोहचता येत नसल्यामुळे ते वेळेवर बिल भरु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पाणी बिल दंडासहित भरावे लागते त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडू नये अशी आमची इच्छा असुन याचा आपण विचार करावा. तसेच शहरातील स्थानिक शेतकर्यांना महिन्या ऐवजी सहा महिन्यांनी बिल आकारणी करुन भरण्याची मुभा देण्यात यावी. सध्या राज्यासह देशामध्येसुध्दा शासनाचे सर्व व्यवहार ऑनलाइन पध्दतीने चालू असुन याचे अनुकरण नगरपरिषदेने करावे. समाजहित डोळ्यासमोर ठेऊन वरिल विषयांवर आपण विचार करुन शहरातील नागरिकांची गैरसोय दुर करावी. असे दिलेल्या पञकात म्हटले आहे.

Comments
Post a Comment