डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने केले 12 टन निर्माल्य संकलन..
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने केले 12 टन निर्माल्य संकलन..
बहे व सांगली या दोन्ही ठिकाणी राबविली स्वछता मोहिम.
निर्माल्यापासुन खतनिर्मिती चा संकल्प,
नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी स्तुत्य उपक्रम.
कार्वे प्रतिनिधी :- ( प्रविण पाटील )
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यावतीने नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम उभे केले आहेत. यामध्ये स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर वृक्षारोपण यासारखी उपक्रम हाती घेतले आहेत त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक गौरी गणपती विसर्जना दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 5 सप्टेंबर 2022 या दिवशी बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली व सांगली कृष्णामाई घाट या दोन ठिकाणी निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलित करण्यात आले. त्यावेळी बहे या ठिकाणी सात टन व सांगली या ठिकाणी पाच टन निर्माल्य जमा झाले यावेळी प्रतिष्ठानचे श्री 120 सदस्य उपस्थित होते या निर्माल्याचे पुढे खत बनवले जाणार आहे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच नदीच्या पात्रात कचरा होऊ नये पाणी दुषित होऊ नये या हेतूने हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला असुन या जमा केलेल्या निर्माल्याचे खत बनविण्यासाठी उपयोग केला जातो. अनंत चतुर्दशी दिवशीही मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलनाचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. प्रतिष्ठान च्या या उपक्रमातुन वेगळा संदेश दिणेत आला असुन या कार्याबाबत पर्यावरण प्रेमीतून समाधान व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment