जयवंत काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.
जयवंत काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.
कराड - प्रतिनिधी.
जुळेवाडी ता - कराड येथील जयवंत काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड पाॅलीटेक्निक कि.म.गड मध्ये शिक्षक दिन साजारा करण्यात आला.आज 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.सर्वपली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून सर्व देशभर साजरा केला जातो.
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून सर्वांना ज्ञान व जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टी मिळत असते.अशा गुरूंचे स्मरण ,पुजा व कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य समजतो.अशा सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
यावेळी काॅलेजचे प्राचार्य श्री.डाॅ .यु.एस.सुतार, सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सर्व विभाग प्रमुख व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment