कराड तालुक्याचे उदयोन्मुख नेतृत्व मा.विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
कराड तालुक्याचे उदयोन्मुख नेतृत्व मा.विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
कराड - प्रतिनिधी.
सहकार महर्षी जयवंतराव भोसले आप्पांचे नातू व कृष्णा सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसलेंचे सुपूत्र विनायक तथा विनूबाबा यांचा वाढदिवस कराड तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मितभाषी, अभ्यासू व विनम्रता या विशेष सदगुणांमुळे विनूबाबांविषयी सर्वत्र आपुलकी व आदराची भावना पहायला मिळते. महाराष्ट्राच्या सहकार व वैद्यकीय क्षेत्रात कराडच्या कृष्णा उद्योग समूहाचे उल्लेखनीय योगदान व नेत्रदीपक कामगिरी सर्वांना हेवा वाटणारी ठरली आहे.
कृष्णा उद्योग समुहाच्या जडणघडणीत आप्पांचा सेवाभावी विचार, सुरेशबाबांचे नीटनेटके नियोजन व विनूबाबांचा सुधारणावादी व तंत्रज्ञान स्नेही दृष्टीकोन यामुळेच कृष्णा उद्योग समूहाने विकासाचा आदर्श मापदंड तयार केला आहे.
संस्थेच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रवास सुरु आहे यामध्ये उदयोन्मुख नेतृत्व मा. विनूबाबा यांचीही मोलाची भूमिका आहे. म्हणूच विनूबाबांचा वाढदिवस समाजातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला.
विनूबाबांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मलकापुरचे सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे कराड तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी विनूबाबांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्याच्या अमतमहोत्सवी वर्षात औषधी वनस्पतींसह फळांची ७५ झाडे मलकापुरातील शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आली. यावेळी राजेंद्र शिंगण, विकास शेवाळे,दिपक लावंड, शंकरराव शिंदे,अजय थोरात, मंगेश पोळ, अमोल शिर्के, या शेतकरी बांधवांना वृक्षवाटप करण्यात आली. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाचे उत्पन्न वाढावे निसर्गाच्या समृध्दीत वाढ व्हावी. वातावरणात शुद्ध प्राणवायूचे प्रमाण वाढावे याचा प्रयत्न केला आहे. असे देशमुख म्हणाले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय देशमुख, राहूल केंगार, प्रदिप शेळके, रधूनाथ कुसळे, संदिप शिंगण, रितेश बारगजे,गणेश ऐतवडेकर,मंगेश सुरवसे,दिपक सागवान,रोहित देवकर यांनी परिश्रम घेतले. विनूबाबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या वृक्षवाटप कार्यक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment