स्व. सौ. सुमनदेवी जयसिंगराव पाटील शारदीय व्याख्यानमालेस सुरवात.

   स्व. सौ. सुमनदेवी जयसिंगराव पाटील शारदीय व्याख्यानमालेस सुरवात.

उंडाळे  येथे व्याख्यानमालेत यावर्षीचे पहिले पुष्प युवा प्रबोधनकार वसंतराव हंकारे यांनी गुंफले .

उंडाळे - प्रतिनिधी.

आयुष्य खूप सुंदर आहे मोबाईलच्या विळख्यात अडकून ते वाया घालवू नका. सळसळणारे रक्त देश, आई-वडील व आपल्या शाळेची मान अभिमानाने उंच करण्यासाठी उपयोगात आणा. असे आवाहन सांगलीचे युवा प्रबोधनकार वसंतराव हंकारे यांनी युवकांना केले.       

येथील  स्व. सौ . सुमनदेवी जयसिंगराव पाटील शारदीय व्याख्यानमालेत यावर्षीचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी कराडचे तहसीलदार विजय पवार, संस्थेचे अध्यक्ष अँड आनंदराव पाटील, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव बी. आर. यादव, शंकरराव पाटील, सरपंच सौ संगीता माळी, व्ही. के. शेवाळे, सौ. गीतांजली पाटील, पंडित पाटील, प्राचार्य बी.आर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.                            

श्री हंकारे म्हणाले, कोरोना सारख्या महाभयंकर रोगाच्या तिन्ही लाटा आपण यशस्वीपणे पेलवल्या कोरोना आणि 2019 च्या महापुरात आपणास अनेक गोष्टी गमावल्या  गेल्यात.  मात्र आज सर्व परिस्थिती स्थिर झालेली दिसते. गेलेल्या सर्व गोष्टी आपणास परत मिळतील पण आयुष्य परत मिळणार नाही आयुष्याला पुन्हा  वन्समोर   नाही म्हणून वर्तमान काळाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा जन्म मृत्यू हे आपल्या हातात काहीच नाही. मिळालेले आयुष्य संघर्ष करत जगणे हेच आपल्या हातात आहे. म्हणून  पेटून उठा संघर्ष करा जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी जाळून चारित्र्यवान माणूस बना. देश सामर्थशाली बनवण्यासाठी त्याचीच आज गरज आहे आई वडील, गुरु आणि देशाचा  कायम आदर करा बाप समजून घ्या आयुष्यातील घुसमट व्यक्त करा आई-वडिलांना मान खाली घालायला लावणारे असे कोणतंही कृत्य करू नका संघर्ष करत जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी जगा व आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करा.                       

कराडचे तहसीलदार विजय पवार म्हणाले  युवा पिढी देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांना घडवण्यासाठी त्यांना चांगले विचार ऐकवण्यासाठी अशा व्याख्यानमालेची गरज आहे. या परिसराला क्रांतिकारकांचा विचारवंतांचा वारसा आहे तेच गुण युवा पिढीमध्ये लावण्याचे काम ही व्याख्यानमाला करत आहे. युवकांनी त्याचा उपयोग करून जुनी संस्कृती परंपरा व नवीन तंत्रज्ञान, संगणक, मोबाईल यांची योग्य सांगड घालून त्याचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी करावा. परिसर स्वच्छ ठेवणे, व्यसनापासून दूर राहणे,  वडीलधाऱ्यांचा आदर करणे ही एक प्रकारची देशसेवाच आहे आणि ती अंगी बानवल्यास वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही. युवकांनी  चांगली पुस्तके वाचावीत स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे, अनुभव घ्यावे त्यातून डॉक्टर, इंजिनिअर यासह जबाबदार अधिकारी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.                    

अँड आनंदराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शंकर आंबवडे यांनी केले. अशोक कोठावळे यांनी आभार मानले.                            



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .