छंदांचा राजा आणि राजांचा छंद म्हणजे फिलॅटली - श्री. आर. डी. शिंदे.
छंदांचा राजा आणि राजांचा छंद म्हणजे फिलॅटली - श्री. आर. डी. शिंदे.
कऱ्हाड, ता. : येथील येथील प्रधान डाकघरात डाक विभागामार्फत दीन दयाल स्पर्श योजने अंतर्गत इयत्ता सहावी ते नववीच्या फिलॅटली चे खाते असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा पार पडली सदर परीक्षेसाठी कऱ्हाड विभागातील विविध शाळांमधील 44 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यासाठी प्रमुख पाहुणे डाक विभागाचे निवृत्त अधीक्षक श्री. आर. डी. शिंदे यांनी प्रमुख उपस्थित होती.
यावेळी शिंदे यांनी तिकिट संग्रहाचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.त्याचबरोबर आपल्याकडील पोस्टाच्या दुर्मिळ अशा तिकिटांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांनी कशा प्रकारे आणि किती तिकिटे संग्रहित केली होती तसेच इंग्लंडचा राजाला देखील तिकिट संग्रह करण्याचा छंद होता म्हणून याला राजांचा छंद असे म्हणतात . जगभरात दोन कोटी लोकांना तिकिट संग्रह करण्याचा छंद आहे त्यामुळे फिलॅटलीला छंदांचा राजा म्हटले जाते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. एम. डी. पाटील डाकघर अधिक्षक कऱ्हाड विभाग कऱ्हाड हे होते. तसेच डाकपाल श्री. एन. व्ही. बिचकर, सहाय्यक डाक अधिक्षक श्री. विजय कदम, डाक निरीक्षक श्री. धनेश यादव, श्री. रमेश गुट्टे, शिक्षक, पालक , विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Post a Comment