बळीराजा शेतकरी संघटनेची २ ऑक्टोंबर रोजी ऊस परिषद.

 

बळीराजा शेतकरी संघटनेची २ ऑक्टोंबर रोजी ऊस परिषद.

कराड/प्रतिनिधी - साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कोणताही कारखाना शेतकऱ्यांना पूर्ण एफ आर पी देत नाही. कारखान्यात काटामारी ही सर्रास सुरू आहे. सर्व बाजूनी शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने समाजमंदिरे उभारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठीक ठिकाणी ऊस वजन काटे उभरावेत असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले. दरम्यान, दोन ऑक्टोंबर रोजी ऊस दरासाठी पाचवडेश्वर मंदिर येथे शेतकऱ्यांच्या ऊस परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संघटने कडून देण्यात आली.

येथील विश्रामगृहावर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी पाटील, सातारा जिल्ह्यात अध्यक्ष विश्वास जाधव, किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर  बळीराजा शेतकरी संघटनेने प्रांताधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. 

 येणारा गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी थंकीत एफ.आर.पी. १५% व्याजासह आजपासून पंधरा दिवसात देण्यात यावी. येणाऱ्या ऊस हंगामासाठी ऊसाचा दर कारखाना सुरु करण्यापूर्वी कारखान्यांनी जाहीर करावा मगच ऊसाला कोयता लावावा. महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफ.आर.पी. देणेचा अध्यादेश रद्द करावा. बळीराजा शेतकरी संघटनेची ऊसाच्या उत्पादन खर्चावर आधारीत ऊसाला प्रतिटन एकरकमी चार हजार रुपये मिळावेत. येणाऱ्या ऊस गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे वजन खाजगी वजन काट्यावर करण्याची परवानगी प्रशासनाने व साखर कारखान्यांनी द्यावी. बेकायदेशीर ऊस वाहतूक करणारे अंगद (दोन/ चार चाकी गाडा) यांना कोणतीही परवानगी प्रशासकीय प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांचेकडून नसताना शेतकऱ्यांची लूट केली जाते. ती थांबवावी. यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी  पोपट जाधव, उत्तमराव खबाले, शंभूराज पाटील, सागर कांबळे यांच्या बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंजाबराव पाटील यांची 'बळीराजा'तून निवृत्ती.

गेली दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या चळवळीत रस्त्यावरची लढाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेतुन निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यापुढे रस्त्यावरच्या लढाईत मी सामील होणार नाही, मात्र संघटनेच्या चळवळीत मार्गदर्शकाची भूमिका निश्चितच निभावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .