एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे यश.

 एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे यश.

कराड प्रतिनिधी:- (प्रविण पाटील)

सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम .एस परीक्षेत शिशु शिक्षण संस्था, कराड यांच्या दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक शाळेतील गुणवत्ता यादीत आर्यन अरुण कदम जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक तर प्रियांका हणमंत टकले हिने जिल्ह्यामध्ये सातवा क्रमांक पटकवला .या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड झाली . या विद्यार्थ्यांना इ.९ वी ते इ.१२ वी प्रतिवर्षी १२००० रु शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे . तसेच पाच विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवर्ती मिळणार आहे . यामध्ये आदर्श भरत जगताप, प्रभुराज सागर पाटील, वेदांतिका धीरज थोरात, दीप्ती संदीप थोरात, रुजुला उत्तम चव्हाण या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धारक म्हणून इ.९वी ते इ.१२वी पर्यंत प्रतिवर्षी 9600 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .