कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे ऑनलाईन वेबिनार संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे ऑनलाईन वेबिनार संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे, कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव. येथे माया नांदे यांचे नुकतेच ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले. त्या सध्या डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून ग्लेनमार्क फार्मा फार्मास्युटीकल्समध्ये कार्यरत आहेत. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सी.जी.एम.पी. प्रॅक्टिसेस इन फार्मा इंडस्ट्री याविषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशासाठी नवनवीन बदल होत आहेत आणि फार्मसी क्षेत्र हे यशस्वीरित्या उंच शिखरावर जाऊन पोहोचत आहे. आणि ह्या शिखराचा पाया हे विद्यार्थी आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी नवनवीन बदल, फार्मसी क्षेत्राची गुणवत्ता जाणून घ्यावी त्यामुळे फार्मा इंडस्ट्री सी.जी.एम.पी. प्रॅक्टिसेस म्हणजे काय, त्याचा फायदा काय व इंडस्ट्रीमध्ये हे कुठे महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.
माया नांदे मॅडम यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार दीप्ती पाटील मॅडम यांनी केले.

Comments
Post a Comment