पंजाबराव पाटील यांना विधान परिषदेवर घ्या शेतकरी संघटनेची मागणी.
पंजाबराव पाटील यांना विधान परिषदेवर घ्या शेतकरी संघटनेची मागणी.
कराड - प्रतिनिधी.
महाराष्ट्रात राजकारणातली घोडदौड ही व्यापक पद्धतीने सध्या घडत असून याच पार्श्वभूमीवर चळवळीतील कार्यकर्ते नेते ही आक्रमक झालेले दिसून येत आहेत चळवळीतील तळागाळातील कार्यकर्त्याला व नेत्याला राजकारणात संधी मिळावी व गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी शेतकरी संघटनेने बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्ती द्यावी , अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे . पंजाबराव पाटील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातील व शेतकरी चळवळीतले नेते असून पंजाबराव पाटील यांना विधानपरिषदेवर घ्या त्यांचे वडील स्वतंत्र सैनिक म्हणून देशासाठी लढले आहेत . त्यांचेकडे नम्रता असून आदर्श नेतृत्व असून शेतकरी गोरगरीब दलित , १८ पगड जमातीसाठी अहोरात्र प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केले जात आहे .
कामगार चळवळ, शेतकरी चळवळ व सामाजिक चळवळीतील नेते यांना महाराष्ट्राच्या राजकारणात योग्य वेळी योग्य संधी देऊन त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी दिली आहे म्हणूनच आता पंजाबराव पाटील यांची विधानसभेवर नियुक्ती करण्यासाठी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे.
एक रकमी एफआरपी मिळाव्यासाठी राज्यभर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे . शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या नेत्याला न्याय मिळणार आहे.. व तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी . जी . पाटील यांना कृषी मूल्य आयोग समितीवर सदस्य म्हणून घेण्यात यावे , अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Comments
Post a Comment