कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे वेबिनार संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे वेबिनार संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री.संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे फॉर्म्युलेशन आणि डेव्हलोपमेंट या विषयावर श्री देवेंद्र तिवारी यांचे वेबिनार संपन्न झाले. ते सध्या अँटिबायोटिक्स मध्ये कॉलिटी हेड म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये सतत ज्ञानाची भर पडावी व फार्मसी क्षेत्राविषयी कायम ज्ञान अवगत व्हावे यासाठी महाविद्यालयांमध्ये सतत विद्यार्थ्यांना नवनवीन काहीतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न चालूच असतो. यावेळी तिवारी सरांनी फार्मास्युटकल फॉर्म्युलेशन त्यातील नवीन होणारे बदल, त्याचा उत्तम दर्जा त्यासाठी वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी तिवारी सरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले. तर सूत्रसंचालन केतकी शिंदे मॅडम यांनी केले.

Comments
Post a Comment